Public toilets : सार्वजनिक स्वच्छतागृहे ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी बांधली जातात. पण प्रत्यक्षात त्याचा वापर करताना अवस्वच्छतेमुळे भीती निर्माण होते. तर काही लोक सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळण्यासाठी पाण्याचे सेवन कमी करतात. याचे एकमेव कारण म्हणजे तेथील अस्वच्छता. सार्वजनिक स्वच्छतागृह कोणतेही असो तेथील अस्वच्छता भयावह असते. जर तुम्ही एखादे सार्वजनिक शौचालय वापरत असाल तर ते किती स्वच्छ असेल, ते वापरताना काय काळजी घ्यायची हे पाहुयात.
सार्वजनिक शौचालयात जाताना सॅनिटायझर स्वत: जवळ ठेवा. जेणेकरून तुम्ही टॉयलेट सीट साफ करण्यासाठी देखील करू शकता. प्रवास करताना तुमच्यासोबत नेहमी सॅनिटायझर ठेवा. टॉयलेट सीटवर आधी सॅनिटायझरचा वापर करा मगच सीटवर बसा.
अनेकदा टॉयलेट सीट साफ करणे शक्य नसते. तेव्हा स्वत:जवळ नेहमी सीट कव्हर ठेवा. हे कव्हर्स बाजारात कुठेही मिळतील.ते कुठेही सोबत घेऊन जाणे सहज शक्य आहे.
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये ठेवलेला साबण कधीही वापरू नका. बरेच लोक याचा वापर करतात. त्यामुळे जंतूंचे संक्रमण होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नेहमी कागदी साबण सोबत ठेवावेत ते तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हात धुण्यासाठी गरम पाणी असल्यास केवळ त्यानेच हात धुवा. तसेच, हात नेहमी 20 सेकंद धुवावेत. तेव्हाच हात जंतूमुक्त होतील.
भारतीय तशा स्वरूपाचे टॉयलेट असेल तर लोक जात नाहीत. पण, भारतीय स्वरूपाचे टॉयलेट वापरणे सुरक्षित आहे. यामुळे कोणतेही आजार होत नाहीत. त्यामुळे त्या पद्धतीचे टॉयलेट वापरण्याचा प्रयत्न करा.