Heat Wave In Maharashtra: अद्याप फेब्रुवारी महिनाही संपलेला नसतानाच विदर्भातील अनेक शहरांमधील तापमान कमालीचं वाढलं आहे. अनेक शहरांमध्ये पाऱ्याने फार मोठी झेप घेतली असून उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत आहे. उपराजधानी नागपूरपासून ते अकोल्यापर्यंत अनेक शहरांच्या तापमानामध्ये फेब्रुवारीतच झालेली वाढ ही उन्हाळा तोंडावर असताना चिंता वाढवणारी आहे. कोणत्या शहरातील तापमान किती होतं पाहूयात या फोटो गॅलरीमधून...
अकोल्यात पारा 38.5 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे.
वाशिमचं तापमान 37.8 अंश सेस्लिअस इतकं होतं.
वर्ध्यामध्ये पारा 38.5 अंश सेल्सिअसवर होता.
उपराजधानी नागपूरचं तापमान 36.8 अंश सेल्सिअस इतकं राहिलं.
अमरावतीचं तापमान 36.4 अंश इतकं होतं.
चंद्रपूरमधील तापमान 36.4 अंश इतकं राहिलं.
यवतमाळचं तापमान 36.2 अंश सेल्सिअस इतकं होतं.