सध्या रशियामध्ये फिफा वर्ल्डकपची धूम सुरू आहे. येथे जगातील सारेच कुशाल खेळाडू त्यांच्या कौशल्याला पणाला लावून खेळत आहेत. मात्र केवळ त्यांचा फीटनेस,प्रॅक्टिस आणि कौशल्यचं नव्हे तर या खेळाडूंसाठी काही अजब गोष्टी त्यांच्या आयुष्यात लकी चार्म आहेत. त्यावर विश्वास ठेवून हे खेळाडू मैदानात उतरत आहेत.
कोलंबियाचा गोलकीपर रेने हिगुइटाचं असंं मत आहे की निळी अंडवेअर घालणं त्याच्यासाठी लकी चार्म आहे.
जर्मन स्ट्राइकर मारियो गोमेज मॅचपूर्वी अगदी उजवीकडे असणारे वॉशरूमच वपारतो.
जर्मन फुटबॉलर आणि मारियो गोमेजच्या सोबत खेळणारा जूलियन ड्राक्सलेर महत्वाच्या मॅचपूर्वी त्याला परफ्युम लावतो.
मोरक्कोचा हर्व रेनार्ड सफेद शर्ट परिधान करतो. 2012 तो हे हमखास करतोच. त्यावेळेस मोरक्कोने अफ्रीकी कप ऑफ नेशंसमध्ये जिंकले होते.
इंग्लंंडचा खेळाडू फिल जोंस पांढर्या लाइन वरून चालणं टाळतो.
ब्राजीलचा डिफेंडर मार्सेलो प्रत्येकवेळेस डावा पाय आधी पुढे टाकतो. ब्राजीलचा फुटबॉलर मार्सेलो मैदानात आल्यानंतर तो लाइनच्या पुढे पहिल्यांदा डावा पाय टाकतो.
फ्रांसच्या 1998 विश्व कप टीमचे खेळाडू त्यांच्या गोलकीपरच्या टकल्यावरून हात फिरवत असे. डिफेंडर लारेंट ब्लांक प्रत्येक मॅचपूर्वी बार्थेजच्या डोक्याला किस करतो.
इंग्लंंडचा डेल एली आजही त्या शिन गार्डचा वापर करतो, जो तो लहानपणापासून वापरत होता. त्याच्यासाठी तो लकी चार्म आहे.