PHOTOS

FIFA World Cup 2022: खेळाडू राहिले दूर, त्यांच्या पार्टनरच गाजवणार फुटबॉलचं मैदान, पाहा Photos

जसजसा कतारमध्ये असणारा फिफा वर्ल्ड कप जवळ येत आहे, तसतसं त्याबाबतची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचू लागली आहे. दिग्गज खेळाडू हा Qatar FIFA World Cup 2022 गाजवणार अशी चर्चा असणानाच आता त्यांच्या लोकप्रियतेला काही सौंदर्यवतींचीही टक्कर असणार आहे. या सौंदर्यवती दुसऱ्यातिसऱ्या कोणी नसून, फुटबॉलपटूंच्या पार्टनर आहेत. चला तर मग, पाहूया कोणत्या स्टार खेळाडूंच्या पार्टनर गाजवणार मैदान.... 

Advertisement
1/5

पोर्तुगालचा (portugal) स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो (cristiano ronaldo) याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसुद्धा (georgina rodríguez) फिफा 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये दिसणार आहे. जॉर्जिया सोशल मीडियावर तिच्या मादक अंदाजासाठी बरीच प्रसिद्ध आहे. 

 

2/5

अर्जेंटिना (argentina) संघाला एकिकडे यंदाच्या फिफा वर्ल्डकपच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात असतानाच या दुसरीकडे याच संघातील किंबहुना फुटबॉल विश्वातील आघाडीचा खेळाडू लिओनेल मेस्सी (lionel messi) याची पत्नी, एंटोनेला रोकुजोसुद्धा (antonella roccuzzo) चर्चेत असणार आहे. 

 

3/5

ब्राझिलचा (Brazil) फुटबॉलपटू नेमार (neymar) याला यंदा त्याची गर्लफ्रेंड ब्रुना बियानकार्डी (bruna biancardi) पाठिंबा देताना दिसणार आहे. त्याच्यासाठी तिचं सोबत असणं किती महत्त्वाचं हे वेगळं सांगण्याची गरजच नाही. 

4/5

उरुग्वे (uruguay) संघाचा स्ट्रायकर लुईस सुआरेझ (luis suarez) आणि त्याची पत्नी सोफिया बलबी (sofia balbi) यांच्या नात्याचे बंधसुद्धा FIFA 2022 मध्ये पाहता येणार आहेत. 

5/5

जर्मनीचा (germany) आघाडीचा खेळाडू थॉमस मुलर (thomas muller) हा कायमच त्याच्या खेळण्याच्या शैलीनं फुटबॉलप्रेमींच्या मनाचा ठाव घेत असतो. यावेळी तो चर्चेत येण्याचं आणखी एक कारण असणार आहे ते म्हणजे पत्नी लिसा मुलर (lisa müller). 





Read More