PHOTOS

काय सांगता! ब्रेकअप झाल्यावर आठवडाभर सुट्टी; 'या' कंपनीने दिली ब्रेकअप लिव्ह

Break Up Leave Policy : मनाच्या असहाय्य वेदना दु:खाच्या वाटा बाजूला सारून हृद्यातून वाहू लागतात तेव्हा अश्रूंचा बांध फुटतो. नात्यांचा बंधात अडकलेली व्यक्ती स्वत:ला देखील सावरू शकत नाही. त्यावेळी गरज असते. समोरच्याला वेळ देण्याची... 

Advertisement
1/8
ब्रेकअप लिव्ह पॉलिसी
 ब्रेकअप लिव्ह पॉलिसी

होय, एका कंपनीने चक्क ब्रेकअप लिव्ह पॉलिसी सुरू केली आहे. यामध्ये ब्रेकअप झाल्यावर कंपनी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी देणार आहे.

2/8
भारतीय कंपनी
 भारतीय कंपनी

ब्रेकअप लिव्ह पॉलिसी म्हटल्यावर तुमच्या डोक्यात परदेशातील एखादी कंपनी आली असेल. मात्र, ही कंपनी परदेशातील नसून भारतीय कंपनी आहे.

3/8
एका आठवड्याची सुट्टी
एका आठवड्याची सुट्टी

ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचं ब्रेकअप झालं तर कर्चमारी एका आठवड्याची सुट्टी घेऊ शकतात.

4/8
खासगी आयुष्य
खासगी आयुष्य

एवढंच नाही तर ब्रेकअप लिव्ह पॉलिसीनुसार कर्मचाऱ्याने सुट्टी घेतली तर त्याला बॉस प्रश्न देखील विचारणार नाही. कर्मचाऱ्याच्या खासगी आयुष्याची काळजी घेतली जाईल.

5/8
कारण नको ना पुरावा नको...
कारण नको ना पुरावा नको...

तुम्ही सुट्टी का घेतली? असा प्रश्न देखील कंपनी विचारणार नाही. तसेच पुरावा देखील मागितला जाणार नाही. गरज असेल तर सुट्टीची मुदत देखील वाढवून दिली जाईल.

 

6/8
मानसिक शांती
मानसिक शांती

लोकांच्या कठीण प्रसंगी आपण कंपनीच्या मागे खंबीरपणे उभं रहायचं असतं. सुट्टी दिली तर मानसिक शांती मिळेल आणि येत्या काळात कर्चमारी चांगलं काम देखील करतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

7/8
फिनटेक
फिनटेक

कर्चमाऱ्यांची ऐवढी काळजी घेणारी कंपनी कोणती? असा सवाल तुम्हालाही पडला असेल. तर या कंपनीचं नाव फिनटेकमधील स्टॉक ग्रो कंपनी आहे.

8/8
स्टॉक ग्रो
स्टॉक ग्रो

स्टॉकग्रो ही भारतातील प्रिमियम फिनटेक स्टार्टअप आहे. जी वापरकर्त्यांना ट्रेडिंग आणि गुंतवणुकीची माहिती मिळवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून देते.





Read More