PHOTOS

ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर चित्रपटांची आतषबाजी; सलग होणार मोठ्या चित्रपटांची टक्कर!

August movie releases: ऑगस्ट महिन्यात प्रेक्षकांसाठी रोमान्स, अ‍ॅक्शन आणि ड्रामा अशा विविध शैलीतील चित्रपटांची मेजवानी ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला एकाच दिवशी तीन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, तर स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आणखी दोन मेगा चित्रपट आमनेसामने येणार आहेत. महिन्याच्या शेवटी एक भव्य रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.

 

Advertisement
1/8
सन ऑफ सरदार 2
सन ऑफ सरदार 2

एक युवक आपल्या गावी जमीन विकण्यासाठी परततो आणि एका तरुणीच्या प्रेमात पडतो. मात्र, त्यानंतर त्याला कळतं की तिचं कुटुंब त्याला ठार मारण्याचा विचार करत आहे. मृणाल ठाकूर, रवी किशन, दीपक डोब्रियाल, कुब्रा सैत आणि नीरू बाजवा यांच्या भूमिका असलेला 'सन ऑफ सरदार 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.

 

2/8
धडक 2
धडक 2

सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनीत हा रोमँटिक ड्रामा ओळख, शक्ती आणि प्रेमाच्या किमतीवर असणार आहे. 'धडक 2' हा चित्रपट तमिळ चित्रपट 'परियेरम पेरुमल'चा हा हिंदी रिमेक असून 'सन ऑफ सरदार 2' सोबतच 1 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे.

3/8
अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी
अजेय: द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट शंतनू गुप्ता यांच्या 'द मंक हू बिकेम चीफ मिनिस्टर' या पुस्तकावर आधारित आहे. अनंत जोशी प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट देखील 1 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला.

4/8
हीर एक्सप्रेस
हीर एक्सप्रेस

कौटुंबिक नाटक असलेला 'हीर एक्सप्रेस' हा चित्रपट निहारिका रायजादा, रोहित चौधरी आणि पंकज झा यांच्या प्रमुख भूमिकेत असून 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

5/8
अंदाज 2
अंदाज 2

आधुनिक नातेसंबंधांवर आधारित ही भावनिक त्रिकोणी प्रेमकथा आयुष कुमार, अकैशा वत्स आणि नताशा फर्नांडिस यांच्या अभिनयाने सजली आहे. 'अंदाज 2' हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

6/8
वॉर 2
वॉर 2

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' हा चित्रपट हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील संघर्षावर आधारित असून कियारा अडवाणीही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

7/8
कुली: द पॉवरहाऊस
कुली: द पॉवरहाऊस

रजनीकांत, आमिर खान आणि नागार्जुन अक्किनेनी अभिनीत हा 'कुली: द पॉवरहाऊस' सूड आणि भावनांनी भरलेला अ‍ॅक्शन ड्रामा असून, या चित्रपटासाठी जगभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्टला रिलीज होणार आहे.

8/8
परम सुंदरी
परम सुंदरी

'परम सुंदरी' हा चित्रपट दिल्लीतील मुलगा आणि केरळमधील मुलगी यांच्या प्रेमकथेवर आधारित असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केले असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. 'परम सुंदरी' चित्रपट 29 ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.





Read More