Actress Producer Love Story: चित्रपटसृष्टीत अशा अनेक कलाकारांच्या प्रेमकथा आहेत ज्या आजही चर्चेत असतात. त्याचप्रमाणे, ही जोडी देखील बॉलिवूडमध्ये आपल्या अनोख्या प्रेमकहाणीमुळे कायमच चर्चेचा विषय ठरली होती.
बॉलिवूडमध्ये अनेक प्रेमकथा गाजलेल्या आहेत. त्यापैकी ही जोडी देखील एकेकाळी प्रचंड चर्चेत होती. अभिनेत्री आणि निर्मात्याच्या या प्रेमकथेत प्रेमाबरोबरच वादही खूप झाले.
आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय त्या म्हणजे श्रीदेवी. त्यांची आणि निर्माता बोनी कपूर यांची प्रेमकथा विशेष गाजली होती. दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्या नात्याला सुरुवातीपासूनच अनेकांचा विरोध होता. अनेक चाहते आणि जवळची मंडळी या नात्याला मंजुरी देत नव्हती.
जेव्हा बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले तेव्हा त्यांचे लग्न मोना सुरीसोबत झाले होते आणि दोन मुलांचे वडील होते- अर्जुन आणि अंशुला कपूर.
मीडिया रिपोर्टनुसार, त्या काळात श्रीदेवी मिथुन चक्रवर्ती यांना डेट करत होत्या. बोनी कपूर आणि श्रीदेवीच्या जवळीकमुळे मिथुन चक्रवर्ती नाराज झाले.
मिथुन यांची समजूत काढण्यासाठी श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांना राखी बांधली होती, असेही सांगितले जाते. यामुळे काही काळासाठी हा विषय तिथेच थांबला.
मिथुन यांनी पत्नीला सोडण्यास नकार दिल्यानंतर श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
मीडिया रिपोर्टनुसार, लग्नावेळी श्रीदेवी आधीच गर्भवती होत्या. 1996 मध्ये दोघांचे लग्न झाले आणि 1997 मध्ये त्यांची मुलगी जान्हवी कपूरचा जन्म झाला. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांना दोन मुली आहेत खुशी आणि जान्हवी. श्रीदेवी यांचा मृत्यू दुबईतील हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून झाला. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते, परंतु नंतर दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृत्यू बाथटबमध्ये बुडून झाला, जो एक अपघात होता