PHOTOS

मासे शाकाहारी असतात की मांसाहारी? उत्तर ऐकून धक्काच नसेल

Fish Is Vegetarian Or Non Vegetarian : मांसाहारी लोक माशांची गणती नेहमीच नॉनव्हेज म्हणजेच मांसाहारात करतात. पण खरंच मासे मांसाहारी असतात की शाकाहारी याबाबत माहिती जाणून घेऊयात. 

Advertisement
1/9

शाकाहारी अन्न उत्तम की मांसाहारी अन्न उत्तम यावर अनेकदा वाद होतो. काही लोक शाकाहाराला प्राधान्य देतात तर काही जण मांसाहारच सर्वोत्तम असल्याचं म्हणतात. मांसाहारात लोक चिकन किंवा मटण ऐवजी सी फूड खाण्याला सुद्धा प्राधान्य देतात. परंतु प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे मासे खरंच मांसाहारी अन्नात मोडतात की शाकाहारी? 

2/9

नॉनव्हेज खाणारी लोकं मासे खाण जास्त पसंत करतात. मासे शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आणि हेल्दी असतात, तसेच मासे डोळ्यांसाठी सुद्धा चांगले असतात. 

3/9

माशांमध्ये 35-45 टक्के प्रोटीन सुद्धा उपलब्ध असतं. याशिवाय त्यात ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाण सुद्धा जास्त आढळतं. जे हृदयाचं आरोग्याचं चांगलं ठेवण्यास मदत करते. 

 

4/9

माशांमध्ये फॅट्सचं प्रमाण हे दुसऱ्या मांसाहारी पदार्थांच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे हे ब्लड प्रेशर सुद्धा कंट्रोल करतं. मासे खाणाऱ्यांचे केस काळे, दाट आणि वेगाने वाढतात. कारण त्याचं ओमेगा 3 केसांमधील ओलावा कमी होऊ देत नाही.

5/9

आता प्रश्न उपस्थित होतो की मासे शाकाहारी आहेत की मांसाहारी. मासे सी फूडच्या कॅटेगरीमध्ये येतात. परंतु काही अशा वनस्पती सुद्धा आहेत ज्या सी फूड म्हणून ओळखल्या जातात. 

6/9

सर्वांना माहितेय की माशांमध्ये डोळे, मेंदू आणि हृदय असतं. मासे गोष्टी जाणवू शकतात आणि अंडी देऊ शकतात. मासे एक प्रकारचे प्राणी असतात आणि त्यांच्यात जीव असतो. इत्यादी कारणांमुळे मासे मांसाहारी आहेत. पण बंगालमध्ये मासे हे शाकाहारी अन्न मानले जाते.

7/9

आता जर तुम्ही शाकाहारी असाल आणि माशांपासून काढलेले ओमेगा-३ तेल हे शाकाहारी आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. माशांपासून बनलेलं तेल हे मांसाहारी असतं. 

 

8/9

माशांपासून बनलेलं तेल हे माशांच्या टिशूतून काढलं जातं, त्यामुळे ते शाकाहारी नसतं. जर तुम्हाला ओमेगा 3 हवे असेल आणि तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्लांट बेस पदार्थांकडे वळावे लागेल. 

9/9

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

 





Read More