PHOTOS

यापूर्वी कधीही मिळाली नाही एवढी सूट; iPhone 15 मिळतोय फक्त XX,000 रुपयांत! उरले फक्त 2 दिवस

iPhone 15 Offer Price: काही महिन्यांमध्ये आयफोनचं 16 वं व्हर्जन लॉन्च होणार आहे. मात्र या फोनसाठी वाट न पाहता तुम्ही आयफोन 15 घेण्यासाठी उत्सुक असाल तर सध्या आयफोनवर घसघशीत सूट मिळत आहे. जाणून घ्या या खास ऑफरबद्दल...

Advertisement
1/9

फ्लिपकार्टवर 'बिग बचत सेल'अंतर्गत (Flipkart Big Bachat Sale) सध्या अनेक गोष्टींवर घसघशीत सूट दिली जात आहे. सध्या सुरु असलेला हा सेल 1 जुलैपासून 7 जुलैपर्यंत असणार आहे. या सेलअंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक पोडक्ट्सवर मोठा डिस्काऊंट दिला जात आहे.

2/9

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये आयफोन 15 चाही समावेश आहे. हा फोन फारच स्वस्तात उपलब्ध होत असून तुम्ही सुद्धा आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

 

3/9

आयफोन 15 फ्लिपकार्टवरील 'बिग बचत सेल'मध्ये 65 हजारांपेक्षा कमी किंमतीला उपलब्ध आहे. तुम्ही पुढील काही महिन्यांमध्ये लॉन्च होणाऱ्या आयफोन 16 ची वाट पाहण्यात फारसे उत्सुक नसाल आणि आयफोन 15 घेण्याचा विचार करत असाल तर पुढील 2 दिवसात काय तो निर्णय घेतल्यास फारच फायदा होईल.

4/9

फ्लिपकार्टवर आयफोन 15 हा 79 हजार 900 रुपयांना मिळत आहे. मात्र 'बिग बचत सेल'मध्ये या फोनवर 18 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 64 हजार 999 रुपयांना उपलब्ध आहे.

5/9

तुम्ही फ्लिपकार्टवरुन हा फोन ऑर्डर केला तर तो 24 तासांमध्ये तुमच्या हातात असेल. मात्र या फोनवरही इतरही वेगवेगळ्या ऑफरअंतर्गत सूट दिली जात आहे. या ऑफर कोणत्या पाहूयात...

6/9

तुम्ही आयफोन 15 खरेदी करण्यासाठी 'बिग बचत सेल'अंतर्गत युपीआयच्या माध्यमातून किंवा नेट बँकिंगवरुन पेमेंट केलं तर तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे हा फोन 63 हजार 999 रुपयांना मिळू शकतो.

7/9

तुम्ही 'बिग बचत सेल'अंतर्गत एक्सचेंज ऑफरचाही फायदा घेऊ शकता. तुमच्याकडे आयफोन 14 किंवा आयफोन 13 असेल तर तुम्हाला एक्सचेंजमध्ये उत्तम रक्कम मिळू शकते. त्यामुले फोनची किंमत अधिक कमी होईल.

8/9

आयफोन 15 च्या फिचर्सबद्दल बोलयाचं झालं तर यामध्ये 6.1 इंचांची स्क्रीन आहे. ही स्क्रीन ओलेड डिस्प्ले असून यामध्ये 48 मेगापिक्सर + 12 मेगापिक्सल कॅमेरा सेटअप आहे. तसेच पुढील बाजूला 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. 

9/9

आयफोन 15 मध्ये ए 16 बायोनिक चिप प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर फारच उत्तम आहे. या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला असून चार्जिंग अधिक सोयीस्कर होणार आहे.





Read More