आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला 10 सेकंदाच्या एका सीनमुळे करिअर सोडावे लागले. कोण आहे हा अभिनेता?
बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना चित्रपटासोबत त्यांच्या एखाद्या सीनमुळे त्यांच्या करिअरला चालना मिळते. त्या एका सीनमुळे ते लोकप्रिय होतात.
असाच एक अभिनेता जो शाहरुख खान आणि आमिर खान यांना टक्कर देण्याच्या तयारीत असताना त्याच्या 10 सेकंदाच्या सीनमुळे असं काही घडलं की त्याचे करिअर बर्बाद झालं.
त्याच्या पहिल्या चित्रपटात अभिनेत्री श्रीदेवी होती. पण, त्यानंतर अभिनेत्याची अशी अवस्था झाली की तो इंडस्ट्रीपासून दूर झाला. कोण आहे हा अभिनेता?
हा अभिनेता दीपक मल्होत्रा आहे. जे बंगळुरुचे आहेत. त्याचे शरीरयष्टी इतकी आकर्षक होती की अनेक प्रसिद्ध छायाचित्रकार त्यांच्याकडे यायचे. त्याला मॉडेलिंगमध्ये सामील होण्यासाठी अनेक ऑफर यायच्या.
त्यासोबतच त्याला अनेक चित्रपटांच्या देखील ऑफर येत होत्या. त्यांचा पहिला चित्रपट 'लम्हे' होता. ज्यामध्ये अनिल कपूर, श्रीदेवी, वहीदा रहमान आणि अनुपम खैर हे कलाकार होते.
या चित्रपटात श्रीदेवीने दुहेरी भूमिका साकारली होती. ती पल्लवी आणि पूजाची. या चित्रपटात दीपकने पल्लवीचा प्रियकर आणि पती सिद्धार्थची भूमिका साकारली होती.
मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. दीपकच्या अभिनयावर अनेक टीका होऊ लागल्या. याच चित्रपटातील दीपकच्या 10 सेकंदाचा सीन वादात सापडला.
तो म्हणजे फोटोत पल्लवी बेशुद्ध पडते आणि सिद्धार्थ तिला उठवण्याचा प्रयत्न करतो. या 10 सेकंदामधील त्याचा संवाद हा प्रेक्षकांना आवडत नाही. या सीनचा परिणाम थेट त्याच्या कारकिर्दीवर झाला.