Kapil Dev Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव हे आज त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकवून दिला. तेव्हा कपिल देव यांनी 1994 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आजही त्यांची कमाई ही कोट्यवधींमध्ये आहे.
कपिल देव यांच्या नेतृत्वात 1983 मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला तेव्हा खेळाडूंना प्रति सामना फक्त 1500 रुपये मिळायचे. मात्र आज कपिल देव यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.
कपिल देव यांची एकूण संपत्ती ही 252 कोटींची असून सध्या त्यांची सर्वाधिक कमाई ही ब्रँड एंडोर्समेंट्स आणि कॉमेंट्रीमधून होते. कपिल देव हे भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक देखील होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार कपिल देव हे एका जाहिरातीसाठी सुमारे 20 ते 30 लाख रुपये घेतात. कपिल देव वर्षभरात जवळपास 12 कोटी रुपये कमावतात.
कपिल देव यांचा दिल्लीमधील सुंदर नगर येथे आलिशान बंगला असून हा बंगला दिल्ली गोल्फ कोर्सच्याजवळ आहे. क्रिकेटनंतर कपिल यांना गोल्फ खेळायला सुद्धा आवडते.
कपिल देव यांना आलिशान गाड्यांचा देखील शौक असून त्यांच्याकडे मर्सिडीज सी220डी, टोयोटा फॉर्च्यूनर, मर्सिडीज जीएलएस 350डी आणि पोर्श सारख्या अनेक कार आहेत.
कपिल देव यांनी भारतासाठी 131 टेस्ट सामने खेळले असून यात 5248 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी 225 वनडे सामने खेळले असून यात 3783 धावा केल्या आहेत. कपिल देव हे उत्कृष्ट गोलंदाज देखील असून त्यांनी टेस्टमध्ये 434 विकेट्स आणि वनडेमध्ये 253 विकेट्स घेतले आहेत.
कपिल देव यांनी रोमी भाटिया यांच्याशी 1980 मध्ये विवाह केला असून त्यांना अमिया नावाची मुलगी देखील आहे. कपिल हे मूळचे चंदीगडचे आहेत.