1983 वर्ल्डकप विजेच्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी विनोद काबंळीला लवकरच भेटण्याचं आश्वासन दिलं आहे.
1983 वर्ल्डकप विजेच्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी विनोद काबंळीला लवकरच भेटण्याचं आश्वासन दिलं आहे.
विनोद कांबळीला मूत्रविसर्जनात त्रास होत असल्याने 21 डिसेंबरला ठाण्यातील रुग्णालयाच्या आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं.
डॉक्टरांनी 52 वर्षीय विनोद कांबळीच्या मेंदूतही गुठळी झाली असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान बुधवारी विनोद कांबळीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
आकृती रुग्णालयाचे शैलेश ठाकूर यांनी सांगितलं की, रुग्णालयात असताना कपिल देव यांनी विनोद कांबळीला व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्यांनी मदतही देऊ केली.
व्हिडीओ कॉलदरम्यान विनोद कांबळीने कपिल देव यांना 'हॅलो कपिल पाजी, आप कैसे हो' अशी विचारणा केली.
कपिल देव यांनी यावर म्हटलं, "मी तुला भेटायला येईन. तू आता बरा दिसत आहेस. दाढीपण काळी केली आहेस. पण उगाच घाई करु नकोस".
कपिल यांनी यावेळी असंही सांगितलं की, "जर आणखी काही दिवस रुग्णालयात राहावं लागत असेल तर राहा. डॉक्टरांना अजून किती दिवस राहण्याची गरज आहे विचार. जेव्हा बरा होशील तेव्हा भेटायला येईन".
विनोद कांबळीने 1991 मध्ये एकदिवसीय सामन्यातून भारतीय संघात पदार्पण केलं होतं. 2000 मध्ये त्याने अखेरचा सामना खेळला. 2009 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
कांबळीने 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले. त्याने कसोटीत 1084 धावा केल्या. तर वन-डेमध्ये 2477 धावा केल्या. यामध्ये 2 शतकं आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.