PHOTOS

Gaj Kesari Rajyog 2023 : गजकेसरी योग! 'या' 4 राशींच्या लोक होणार श्रीमंत

Guru Chandra Yuti :  गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे अतिशय शुभ आणि शक्तिशाली गजकेसरी योग तयार होत आहे.  यामुळे काही राशीच्या नशिबात श्रीमंत होण्याचे योग तयार झाले आहेत. 

Advertisement
1/6
गजकेसरी राजयोग
गजकेसरी राजयोग

नुकतेच 14 एप्रिलला सूर्याने मीनतून मेष राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे बुद्धादित्य योग तयार झाला आहे. आता सोमवारी 17 एप्रिलला देवगुरु आणि चंद्र यांच्या संयोगामुळे गजकेसरी राजयोग जुळून आला आहे.

2/6
गजकेसरी योग कसा तयार होतो?
गजकेसरी योग कसा तयार होतो?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गज म्हणजे हत्ती आणि केसरी म्हणजे सिंह. कुंडलीत हत्ती आणि सिंह यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. कुंडलीत गुरू आणि चंद्र बलवान असताना गजकेसरी योग जुळून येतो. 

3/6
कन्या (Virgo)
कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी योग खूप भाग्यशाली ठरणार आहे. नवीन कामात यश मिळणार आहे. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होणार आहे. विवाह इच्छुकांची लग्न ठरू शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.  

4/6
कर्क (Cancer)
कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फलदायक आणि आनंददायी ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. सरकारी नोकरीची संधी चालून येणार आहे. घरात शुभ कार्य ठरणार असल्याने आनंदाचं वातावरण असणार आहे. 

5/6
मिथुन (Gemini)
मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग छप्पड फाड भाग्य घेऊन येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं फळ मिळणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

6/6
वृषभ (Taurus)
वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. उत्पन्न आणि लाभ या दोघांचा संयोग दिसून येणार आहे. परदेशी वारीचे योग आहेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)





Read More