Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या पूजेत चुकूनही तुळशी दल किंवा केतकीचे फूल वापरू नये. गणपतीच्या पूजेमध्ये शिळी किंवा सुकलेली फुले देऊ नयेत.
Ganesh Chaturthi 2023: काही दिवसातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. बाप्पाचे सारे भक्त गणेश चतुर्थीची वाट पाहत आहेत. दु:ख दूर करणारा आणि सुख देणारा म्हणून बाप्पाला सर्वांना भावतो. अशा गणपती बाप्पाची पूजा अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात या पवित्र तिथीचे महत्त्व अधिक असते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला अशी धार्मिक मान्यता आहे. या शुभ दिनी कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या टाळायला हव्यात? याबद्दल जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीच्या शुभ तिथीला देश-विश्वात राहणारे हिंदू आपल्या घरी गणपती आणतात. त्याची विधीपूर्वक प्रतिष्ठापना करतात. बाप्पाची मनोभावे पूजा करतात. तुम्हीही तुमच्या घरी गणपती बसवणार असाल तर त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, चला जाणून घेऊया.
गणेश चतुर्थीच्या दिवशी घरामध्ये अर्धवट किंवा तुटलेली गणेशमूर्ती स्थापित किंवा पूजा करु नका.
गणेश चतुर्थीच्या पूजेत चुकूनही तुळशी दल किंवा केतकीचे फूल वापरू नये. गणपतीच्या पूजेमध्ये शिळी किंवा सुकलेली फुले देऊ नयेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी व्रत आणि उपासना करणाऱ्या व्यक्तीने शरीर, मन शुद्ध ठेवून ब्रह्मचर्य पाळावे. या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही शारीरिक संबंध ठेवू नयेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला अर्पण केलेला प्रसाद आणि फळांचे सेवन करावे. गणपतीच्या पूजेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
गणेश चतुर्थीच्या दिवशी व्यक्तीने दिवसा झोपू नये किंवा कोणाला शिवीगाळ करू नये. श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी व्यक्तीने मनात सतत गणेश मंत्राचा जप करत राहावे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)