बाप्पासाठी मोदक बनवत असताना थोडं टेन्शन सगळ्यांनाच येतं. मोदक फुटले किंवा पारी नीट आली नाही तरी मोदक फसतो, अशावेळी या पाच चुका टाळा मग मोदक मऊसूत होतील.
गणेशोत्सव म्हटलं की मोदक कर आलेच. बाप्पासाठी मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो. मात्र, कधी कधी मोदक फसतात किंवा थंड झालेले मोदक कडक होतात. अशावेळी काय करायचा हा प्रश्न पडतो, तेव्हा या टिप्स लक्षात ठेवा.
बाप्पाला नैवैद्य दाखवल्यानंतर जेवायला बसल्यानंतर मोदक कडक होतात. अशावेळी या पाच चुका टाळाच.
मोदकाची उकड काढत असताना पहिले तूप टाकून त्यात अर्धा कप दूध आणि अर्धा कप दूध घ्या. व चांगली उकळी काढून घ्या. यामुळं मोदक पांढरे शुभ्र व मऊसूद होतात.
दुसरी चूक म्हणजे मोदकासाठी वापरण्यात येणारी पिठी ही कोणत्याही तांदळाची चालत नाही. रेशनचा तांदूळ किंवा जुना तांदुळ टाळावा. या तांदळामुळं मोदकाची पारी कडक होते किंवा फाटते. कारण या तांदळातील पाण्याचे प्रमाण कमी असते.
तांदळाच्या पीठीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन ती तशीच पाच मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्या. उकड फार थंड होऊ देऊ नका. गरम गरम असतानाच उकळ मळायला घ्या.
उकड गरम असताना मळताना हाताचा चटके बसतात. अशावेळी एखादे मोठे भांड घेऊन त्यावर तूप लावून घ्या आणि उकड चांगली मळून घ्या.
मोदकाची पारी पातळ झाली पाहिजे. मोदकाची पारी जाडसर ठेवू नका. तसंच, कळ्या पाडत असताना खालपर्यंत कळ्या पाडल्या तर मोदक फुटत नाही.
मोदक तयार करुन झाल्यानंतर एका छोट्या वाटीत पाणी घ्या व हलकेचे त्यात डिप करुन मोदकपात्रात ठेवा, तसंच मोदक ठेवताना दोन मोदकांत अंतर ठेवा