जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.
नेहा पारिख यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन खूप सुंदर रित्या केले, वेगवेगळया फुलांने केले बाप्पाचे आरास मनमोहक.
नीरज देशपांडे यांनी बाप्पाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला, लाडक्या बाप्पांची मूर्ती अगदी सुंदर आहे.
यंदा प्रभुणे परिवाराने बाप्पाचे आगमन चांद्रयान थिम सोबत केले आहे. तर या सोबत गौरीची सुंदर प्रतिमा देखील बघायला मिळत आहे.
प्रसादे यांच्या घरी गौरी गणपतीची स्थापना अगदी सुंदरपने पार पडली आहे, बाप्पाची मूर्ती खूप मनमॊहक आणि प्रसन्न दिसत आहे.
या वर्षा छत्रपती शिवाजी महाराजचे 350 वा राज्याभिषेक वर्ष आहे, त्या निमिताने पायगुडे परिवाराने रायगड वरिल छत्रपतींची मेघडंबरी (सिंहासन), घरच्या गणपती बाप्पासाठी बनवले .
खासरी परिवाराने यंदा घरातील सर्व चिमुकल्यांकडून त्यांच्या मनातील चित्र काढायला सांगून, आणि त्यांच्या हाताचे ठसे वापरून लाडक्या बाप्पाचे अनोखे डेकोरेशन केले आहे.
केदार पित्रे यांनी त्यांच्या घरच्या गणपतीसाठी अनोखी सजावट केली आहे. पेपर कपचा वापर करून काल्पनिक मंदिर उभारले आहे. सोबतच आपल्या तिरंगा झेंडाची देखील पेपर कपनी केलेली प्रतिकृती सजावटीमध्ये समाविष्ट आहे. असा सजलेल्या देखाव्यात गणपती बाप्पा अधिकच शोभून दिसत आहेत.
कोल्हापूर मधील मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी त्यांच्या घरी बाप्पाची सजावटही बाळूमामा यांचे स्वरूपाने केली आहे. तर या वेगळ्या पद्धतीचे बाप्पाचे स्वरूप खूप सुंदर आहे.
मनमोहक अश्या फुलांच्या माळांने नेहाली रणबागले यांनी सजवले आपल्या लाडक्या बाप्पाला.
यंदा यादव परिवाराच्या चिमुकल्या शिवार्थने बाप्पासाठी फुलांचं डेकोरेशन करत लाडक्या गणरायाची स्थापना केली आहे.
कोकीळ परिवाराने यंदा गौरी-गणपती यांची स्थापना केली आहे, गौरी दोन दिवसांच्या पाहुणचारासाठी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. आणि यादिवशी गौराईसाठी खास नैवेद्य केला जातो.