PHOTOS

पालखी निघाली राजाची...; लालबागच्या राजापुढं कोळी बांधवांनी पारंपरिक वाद्यांवर धरला ठेका

Ganesh Visarjan 2023 : इथं मुंबईमध्ये दिवस जसजसा पुढे जात आहे तसतशी शहरातील गर्दी वाढत आहे. लालबाग परळ भागामध्ये याची खरी धूम पाहायला मिळतेय. 

 

Advertisement
1/7
लालबागचा राजा
लालबागचा राजा

Ganesh Visarjan 2023 : लालबागचा राजा, अर्थात स्थानिक आणि कोळी बांधवांसाठी मार्केटचा राजाही विसर्जनासाठी सज्ज झाला आहे. 

 

2/7
कार्यकर्त्यांची लगबग
कार्यकर्त्यांची लगबग

बाप्पाची मंडपातील अखेरची आरती होण्याआधी कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. तर, भाविकांनीही बाप्पाला निरोप देण्यासाठी गर्दी सुरु केली आहे. 

 

3/7
कोळी बांधवांचीही उपस्थिती
कोळी बांधवांचीही उपस्थिती

गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी करण्यात आलेल्या गर्दीमध्ये कोळी बांधवांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

 

4/7
लबागच्या राजाचरणी सलामी
लबागच्या राजाचरणी सलामी

कोळ्यांचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाचरणी सलामी देण्यासाठी म्हणून गुरुवारी सकाळपासूनच कोळी बांधवांनी येण्यास सुरुवात केली. 

 

5/7
वाद्यांच्या तालावर ठेका
वाद्यांच्या तालावर ठेका

पारंपरिक वाद्यांच्या तालावर या मंडळींनी ठेका धरला आणि वाजत गाजत गणरायाला निरोप देण्याचं एक डोळ्यात पाणी आणणारं चित्र इथं पाहायला मिळालं. 

 

6/7
बाप्पा वर्षभरानंतरच आपल्याला भेटणार
बाप्पा वर्षभरानंतरच आपल्याला भेटणार

उत्साह पराकोटीचा होता आणि आहे. पण, या उत्साहाच्या मागं मनात कुठंतरी बाप्पा वर्षभरानंतरच आपल्याला भेटणार याचीही खंत डोकावत होती हे नाकारता येणार नाही. 

 

7/7
कायम पाठीशी उभा राहा!
कायम पाठीशी उभा राहा!

गणरायाचरणी एकच प्रार्थना, सर्वांना सुखात ठेव, विघ्न दूर ने आणि कायम पाठीशी उभा राहा! 

 





Read More