गणपतीच्या या दिवसात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी बाप्पाच्या सेवेत सगळे मग्न आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची आरास ही बघण्यासारखी आहे.
रोहित अनंत होले खडकमाळ आळी, पुणे यांनी आपल्या घरच्या गणपतीची छान अशी आरास करून कृष्णाच्या संबंधीत सजावट केली आहे. त्यात गोकुळ, वृदांवन, दहीहंडी आणि महाभारताचाही देखावा साकारला आहे.
हिंगोली येथील राजमुद्रा गणेश मंडळाच्या 5 व्या गणपतीसाठी वर्षी माती, कागदाच्या वाट्या यांच्यापासून पर्यावरण पुरक सजावट केली आहे. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक संदेशही दिला आहे.
बीडमध्ये राहणाऱ्या दास कुटुंबीयांच्या घरी बाल गणेशांचे आनंदात आगमन झाले आहे. त्यांनी कापूस, मोर पिसे लावून शिपल्यात बसलेल्या गणपती बाप्पाचा देखावा साकारला आहे.
पुण्यातील संकेत मोरे आणि ऋतूजा मोरे यांनी आपल्या घरी जेजुरीची प्रतिकृती तयार करून बाप्पासाठी सुबक आरास केली आहे.
रोहित राणा यांनी आपल्या घरी चाळीसगावला गणपतीसाठी सजावट करताना श्री बलभद्रा, श्रीमती सुभद्रा, श्री जगन्नाथ आणि श्री सुदर्शन यांच्या देखावा साकरला आहे. त्यांनी सुंदर लाईटींगचाही यासाठी वापर केला आहे.
स्वदीप दत्ता बासुतकर यांनी आपल्या घरी शंकर भगवानांच्या रूपातील गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि त्याला साजेशी छान सजावटही केली आहे.
श्रीराम राजाराम तेली यांनी आपल्या घरी श्रीराम मंदिर साकारून गणपतीसाठी आकर्षक अशी आरास केली आहे. त्यात मोठे बैल, सुंदर राम मंदिर आणि त्यात रामाची मूर्तीही ठेवली आहे.