प्रत्येकाच्या घरी आणि मंडळांमध्येही गणपती बाप्पासाठी खास आरास केली. वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक देखावे आपल्याला बघायला मिळतात. या सोहळ्यात सगळे उत्साहाने सहभागी होतात. त्यामुळे हे देखावे अधिकच खास बनतात.
पेंढारी कुटुंबियांनी आपल्या घरातील गणेश सजावटीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळावेत हा संदेश दिला आहे. 'चालकाला सुबुद्धी दे रे बाप्पा !' असे म्हणत त्यांनी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
पाटील परिवाराने गणपतीसाठी फुलांची सुंदर आरास केली आहे. लाल, गुलाबी आणि पांढऱ्या फुलांच्या देखाव्यात बाप्पा शोभून दिसत आहे.
यांनी आपल्या घरी बाप्पाच्या देखाव्यामध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या थीमचा वापर केला आहे. त्यासंबंधीत छोट्या प्रतिकृती तयार करून त्यांनी संपू्र्ण सजावट केली आहे.
पडवळ कुटुंबियांनी गणपती बाप्पासाठी भारतीय रेल्वेचा देखावा साकारला आहे. त्यात त्यांनी रेल्वे आणि पाली रेल्वे स्टेशनची हुबेहुब प्रतिकृती तयार केली आहे.
गणेश कामशेत यांनी गणपतीच्या देखाव्याला किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. त्यात त्यांनी स्वामी समर्थ, दत्तांची प्रतिमा लावून बाप्पाच्या पुढे विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीही ठेवली आहे.
कोयंडे कुटुंबियांनी हिमालय आणि शिवलिंग तयार करून आपल्या गणपतीची सुंदर अशी आरास केली आहे.