Ganeshotsav News: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. घराघरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबगदेखील सुरू आहे. तुम्हीदेखील ट्रेनने गावी जाणार आहात का तर तुमचा प्रवास गोड होणार आहे.
27 ऑगस्टरोजी गणेशोत्सव आहे. गणपती बाप्पा हे महाराष्ट्राचे लाडके दैवत आहे. त्यामुळं बाप्पासाठी लाखो चाकरमानी गावी जाण्यासाठी निघतात.
तुम्ही जर ट्रेनने गावी जाण्याचा बेत आखताय तर तुमचा प्रवास गोड होणार आहे. कारण आयआरसीटीसीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
मुंबई-कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आयआरसीटीसीच्यावतीने उकडीचे मोदक वाटण्यात येणार आहे.
तेजस- वंदे भारत एक्स्प्रेस या दोन गाड्यांमध्ये उकडचे मोदक वाटण्यात येणार आहेत. त्यामुळं प्रवाशांचा आनंद आणखी वाढणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-सीएसएमटी वंदे भारत (गाडी क्रमांक 22229/30) आणि सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22119/20) या एक्सप्रेसमध्ये मोदक वाटण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे, गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाडीत मोदक वाटण्यात येणार आहे.
दरम्यान, एकीकडे मोदक वाटपाचा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी 'जनता खाना' अर्थात २० रुपयांत पुरी-भाजी देण्यात येते. याबाबत कोणताही सूचना अद्याप आली नाहीये.