PHOTOS

साखर- खवा न घालता, 8-10 दिवस टिकणारे मोदक, बाप्पाच्या नैवेद्यासाठी हटके Recipe

बाप्पाच्या आगमनासाठी एक महिनाच शिल्लक आहे. आता घराघरात लगबग सुरूये त्या बाप्पाच्या सजावटीची. यंदा बाप्पाला कोणता देखावा करायचा असे प्रश्न अनेकांना पडू लागलेत. तर पाच दिवस मोदकांव्यतिरिक्त आणखी काय नैवेद्य करता येईल, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. 

Advertisement
1/8
साखर- खवा न घालता, 8-10 दिवस टिकणारे मोदक, बाप्पाच्या नैवेद्यासाठी हटके Recipe
साखर- खवा न घालता, 8-10 दिवस टिकणारे मोदक, बाप्पाच्या नैवेद्यासाठी हटके Recipe

बाप्पासाठी काहीतरी हटके पण पारंपारिक पदार्थ नैवेद्यासाठी करायचे असतील तर आज आम्ही तुम्हाला एक हटके पदार्थ सांगणार आहोत. 

2/8

उकडीचे मोदक हा तर सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण बाप्पाला उकडीचे मोदक व्यतिरिक्त दुसऱ्या पदार्थाचे मोदक करायचे असतील तर तुम्ही रव्या-नारळाचे मोदक करु शकता. हे मोदक 8-10 दिवस टिकतात. पाहुयात याती पाककृती

3/8
साहित्य
साहित्य

1 कप बारीक रवा, 1 कप ओला नारळ, 1 कप गूळ, 1/4 कप साजूक तूप, वेलची पावडर, सुकामेवा, 1-4 चमचे दूध 

4/8
कृती
कृती

सगळ्यात पहिले एका कढाईत दोन चमचे तूप घेऊन चांगले गरम करुन घ्या. आता त्या तूपात रवा चांगला भाजून घ्या. 

5/8

रवा भाजून झाल्यानंतर पुन्हा एकदा तूप टाकून बदाम-मनुके यासारखे सगळे सुकामेवा तुपात परतून घ्या. 

6/8

आता या मिश्रणात ओले खोबरे टाकून पुन्हा एकदा रवा, सुका मेवा हे सर्व चांगले परतून घ्या. 

7/8

आता एका भांड्यात पुन्हा तूप घेऊन त्यात गूळ घ्या आणि चांगला वितळून घ्या.  गुळ चांगला वितळला की रव्याच्या मिश्रणात टाकून मिश्रण एकजीव करा. 

8/8

आता या मिश्रणातून मोदक बनवण्यास सुरुवात करा. आता मोदकाचा साचा घेऊन त्यात मिश्रण भरा आणि रव्याचे मोदक तयार

 





Read More