Gatari 2024:उद्यापासून श्रावण महिना सुरु होणार. त्यात आज रविवार आणि गटारीचा दिवस. यामुळे राज्यभरात चिकन/मटणसाठी भल्यामोठ्या रांगा लागलेल्या दिसतील.
नॉनव्हेज खाणाऱ्या बहुतांश घरात आज गटारीची जय्यत तयारी सुरु असेल. आज गटारी असली तरी एका दिवसात किती चिकन खायला हवं तुम्हाला माहिती आहे का?
एक सामान्य सुदृध व्यक्ती आपल्या आहारातून साधारण 25 ते 40 टक्के कॅलरी फॅट प्राप्त करतो. जी माणसं खूप मेहनत करतात, त्यांना जास्त कॅलरीची गरज असते. पण जे जास्त शारीरिक मेहनत घेत नाहीत,त्यांना जास्त कॅलरीची गरज नसते.
जास्त शारीरिक श्रम न करणाऱ्या व्यक्ती जास्त दूध, दही, तूपाचे पदार्थ किंवा मासांहार करतात तेव्हा त्यांना स्थूलपणाला सामोरे जावे लागते. तसेच त्या व्यक्ती विविध आजारांना बळी पडतात.
ज्या व्यक्तींना मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणजेच मधुमेह, उच्च रक्तदाव, ट्रायग्लिसराइड, कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचा आजार असेल त्यांना साधार 10 ते 15 टक्के कॅलरी मिळेल असे सेवन करायला हवे.
ओमेगा 3 सारखे काही गरजेचे फॅटी एसिड्स फॅट्स आहेत, जे केवळ भोजनातून मिळतात, ते आपल्या शरीरासाठी अनिवार्य आहेत. इतर फॅटी अॅसिडमुळे आपले शरीर कार्बोहायड्रेट्स किंवा प्रोटीन स्वत:निर्माण करते.
तुम्ही सर्वसाधारण आयुष्य जगताय. म्हणजे अॅथलिट, बॉडीबिल्डर, वेटलिफ्टर, स्ट्रॉंगमॅन अशा व्यवसायात नसाल तर हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे. कारण अशावेळी तुम्ही साधारण 30 ग्रॅम प्रोटीन शरिराला देऊ शकता.
आता चिकनच्या हिशोबात 30 ग्रॅम प्रोटीन पाहायला गेलं तर 100 ग्रॅम चिकनमध्ये 30 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे एकावेळेस तुम्ही 100 ग्रॅम चिकन खाऊ शकता.
पण 100 ग्रॅम चिकनसोबत शरीराला उपयोगी असणारे कार्ब, विटामिन, फायबर असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणेदेखील आवश्यक आहे.