Gautam Gambhir On National Deuty : क्रिकेट सल्लागार समितीने अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुश्री सुलक्षणा नाईक यांनी मंगळवारी एकमताने गौतम गंभीरची टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शिफारस केली होती. अशातच आता त्याची नियुक्ती झालीये.
बीसीसीआयने क्रिकेट सल्लागार समितीचा अहवाल आल्यानंतर गौतम गंभीरची हेड कोच म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे आता तो पुन्हा टीम इंडियाचा भाग झाला आहे.
गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेतून जबाबदारी स्वीकारेल, जिथं टीम इंडिया 27 जुलै 2024 पासून 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे.
गौतम गंभीरचं नाव जाहीर झाल्याने आता 27 जुलैपासून गंभीर पुन्हा नॅशनल ड्युटीवर दिसेल. गंभीर टीम इंडियामध्ये कोणते बदल करणार? यावर देखील सर्वांचं लक्ष असेल.
गौतम गंभीरकडे भारतीय क्रिकेट संघाच्या विकास आणि कामगिरीवर देखरेख ठेवण्यासाठी जबाबदार असेल, असं बीसीसीआयने प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
गंभीरचे लक्ष उत्कृष्टता, शिस्त आणि टीमवर्कची संस्कृती विकसित करण्यावर असेल, तसेच तरुण प्रतिभेचं संगोपन करणं आणि जागतिक स्तरावरील भविष्यातील आव्हानांसाठी संघाला तयार करणं, असं बीसीसीआयने म्हटलंय.