Natasha Gambhir Instagram Post: टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा आता गौतम गंभीरच्या खांद्यावर आली आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी गौतम गंभीरचं नाव जाहीर केल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केलाय.
अनिल कुंबळेपासून अनेक दिग्गज खेळाडूंनी गौतम गंभीरचं अभिनंदन केलं. अशातच आता गौतम गंभीरच्या पत्नीची पोस्ट व्हायरल झालीये.
गौतम खऱ्या अर्थाने टीम इंडियाच्या हेड कोच होण्याचा दावेदार आहे, अशी पोस्ट गौतम गंभीरच्या पत्नीने केली आहे.
गौतमची पत्नी नताशाने दोन स्टोरी रिपोस्ट केल्या आहेत. त्यावर तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नताशा नेहमी गंभीरला प्रत्येक कामात मदत करत आली आहे. गंभीर खासदार झाला तेव्हा देखील नताशाने त्याला खंबीर साथ दिली होती.