PHOTOS

भाकरी, झाडलोट, गौतमी पाटील अन् 'ती' कॅप्शन... गावरान स्टाइलमध्ये म्हणाली, 'जाळ्यात तुझ्या...'

Gautami Patil Photo: महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेली नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील! गौतमी जिथे जाईल तिथे तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. तिने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो पोस्ट केले असून हे फोटो पाहून चाहत्यांना गौतमीचा हा गावरान लूकही फार भावला आहे. तिने पोस्ट केलेली कॅप्शनही चर्चेत आहे. पाहूयात गौतमीने पोस्ट केलेल्या फोटोंना कॅप्शन देताना काय म्हटलंय....

Advertisement
1/12

नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या डान्ससाठी महाराष्ट्रभर ओळखली जाते. मागील काही महिन्यांमध्ये गौतमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

2/12

तिच्या नृत्य कलेबरोबरच गौतमी चर्चेत राहण्यामागील कारण म्हणजे तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दी आणि त्यामधून निर्माण होणार गोंधळ.

3/12

गौतमीला पाहण्यासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी होते आणि तिथे हाणामारी असो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणं असो असे गोंधळ कायम होत असतात.

4/12

ते काहीही असलं तरी गौतमीची लोकप्रियता मात्र कमी झालेली नाही. सोशल मीडियावरही ती प्रचंड लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 11 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. 

5/12

गौतमीने नुकतेच काही फोटो शेअर केले असून तिने झाडलोट करताना शूट केलेला एक रिलही पोस्ट केला आहे. 

6/12

गौतमीने पोस्ट केलेल्या या रिलमधील गाण्याचे बोलही उडत्या चालीचे आहेत. 'बाई याला सांगा ना माझ्या मागं मागं भलताच फिरु नको, साधी भोळी नाय मी गावरान आहे तू मस्का मारु नको. पटायची नाय मी पटायची नाय. जाळ्यात तुझ्या मी फसायची नाय' या लिरिक्सवर गौतमीने डान्स केला आहे.

7/12

गौतमीने चुल्हीवर भाकरी करत असतानाचेही काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गौतमी चुल्हीच्या बाजूला बसून परातीमध्ये बाजरीच्या भाकरी थापताना दिसत आहे.

8/12

'चुलीवरची भाकरी' अशी 2 शब्दांची कॅप्शन या फोटोंना गौतमीने दिली आहे. तसेच फायर आणि हार्ट इमोजी तिने कॅप्शनमध्ये वापरला आहे.

9/12

गौतमी अगदी भाकरी भाजण्यापासून थापण्यापर्यंत सर्व गोष्टी अगदी हसत हसत करत असल्याचं फोटोंमध्ये दिसतंय.

10/12

एका फोटोमध्ये गौतमी भाकरी भाजताना अगदी मनसोक्तपणे हसतानाही दिसतेय.

11/12

गौतमी पोस्ट केलेल्या भाकरी करतानाच्या या फोटोंना दीड लाखांहून अधिक लाईक्स 15 तासांमध्ये मिळाले आहेत. 

12/12

गौतमीचे हे भाकरी करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गौतमीचे हे फोटो पाहून अनेकांना राधा कुडेने गायलेलं आणि गौतमी ज्या गाण्यावर आपल्या कार्यक्रमात नाचते ते 'पाव्हणं जेवला काय?' गाणं आठवलं आहे.





Read More