PHOTOS

General Knowledge: महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!

Indian Currency Note: आपल्या भारतीय नोटांवर किंवा भारतीय चलनावर आपण नेहमी महात्मा गांधींचा फोटो पाहतो. पण बापूंच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो असायचा?  याचा कधी विचार केला आहे का?

Advertisement
1/9
महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!
महात्मा गांधींच्या आधी नोटेवर कोणाचा होता फोटो? जाणून घ्या भारताच्या इतिहासातलं रहस्य!

आपल्या भारतीय नोटांवर किंवा भारतीय चलनावर आपण नेहमी महात्मा गांधींचा फोटो पाहतो. पण बापूंच्या आधी नोटांवर कोणाचा फोटो असायचा?  याचा कधी विचार केला आहे का?

2/9
भारताच्या इतिहासातील गुपित
भारताच्या इतिहासातील गुपित

अमेरिकेच्या नोटांवर अनेक राष्ट्राध्यक्ष आणि इतर महत्त्वाच्या लोकांचे फोटो आहेत तर यूकेच्या नोटांवर राजा किंवा राणींचे फोटो आहेत. भारतातील प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आहे. पण गांधीजींच्याआधी भारतीय नोटांवर कोणाचे फोटो होते हे समजून घेण्यासाठी भारताच्या इतिहासातील गुपित माहिती असणं गरजेचं आहे.

3/9
100 व्या जयंतीनिमित्त
 100 व्या जयंतीनिमित्त

1969 मध्ये बापूंच्या 100 व्या जयंतीनिमित्त भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो पहिल्यांदा छापण्यात आला होता. या फोटोत सेवाग्राम आश्रमासमोर गांधीजी बसले होते.

4/9
महात्मा गांधींचा हसरा चेहरा
 महात्मा गांधींचा हसरा चेहरा

1987 मध्ये पहिल्यांदा भारतीय नोटांवर महात्मा गांधींचा हसरा चेहरा दाखवण्यात आला. त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये गांधीजींचा हसरा चेहरा असलेली 500 रुपयांची नोट जारी करण्यात आली. ही नोट भारतीय नोटांमधील महत्त्वाचा बदल होता. कारण याआधी या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र स्मितहास्य न करता छापण्यात आले होते.

5/9
महात्मा गांधींचा सन्मान
महात्मा गांधींचा सन्मान

तेव्हापासून प्रत्येक भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो छापला जात आहे. ज्याद्वारे बापूंना सन्मान देण्यात आला. महात्मा गांधींचा फोटो असलेल्या भारतीय नोटा हे हळुहळू मुख्य ओळख चिन्ह बनून गेले.

6/9
राजा जॉर्ज VI चा फोटो
 राजा जॉर्ज VI चा फोटो

1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 1949 मध्ये प्रथमच एक रुपयाची नोट जारी केली. ज्यामध्ये सारनाथच्या अशोक स्तंभाच्या जागी राजा जॉर्ज VI चा फोटो लावण्यात आला होती.

7/9
वेगवेगळी चिन्हे आणि डिझाइन
वेगवेगळी चिन्हे आणि डिझाइन

त्यानंतर 1950 च्या दशकात भारतीय नोटांवर आशियाई सिंह, सांबर हरण आणि शेतीच्या प्रतिमा यांसारखी वेगवेगळी चिन्हे आणि डिझाइन वापरण्यात आले.

8/9
प्रगती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश
प्रगती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश

1980 च्या दशकात नोटांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती दर्शविणाऱ्या फोटोंचा समावेश होता. 2 रुपयांच्या नोटेवर आर्यभट्ट उपग्रह आणि 5 रुपयांच्या नोटेवर कृषी यांत्रिकीकरणाचा फोटो लावण्यात आला. 

9/9
नोटांवर कायमस्वरूपी महात्मा गांधींचा फोटो
 नोटांवर कायमस्वरूपी महात्मा गांधींचा फोटो

1990 च्या दशकात आरबीआयने सुरक्षितता वाढविण्यासाठी नोटांवर कायमस्वरूपी महात्मा गांधींचा फोटो समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. 1996 मध्ये महात्मा गांधी सिरिजचे नवे चलन सादर करण्यात आले. ज्यामध्ये त्यांचा फोटो तसेच इतर सुरक्षा वैशिष्ट्ये देखील होती.





Read More