General Knowledge Tricky Questions: आजकालच्या स्पर्धेच्या युगात आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती असणं गरजेचं असतं. सामान्य ज्ञान नसेल तर शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत अनेक ठिकाणी अडथळे आणि आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
General Knowledge Tricky Questions: आजकालच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचं आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींची माहिती ठेवावी लागते. त्याशिवाय तुम्ही कोणत्याही सरकारी नोकरीची अपेक्षाच करू शकत नाही.
आज आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाशी संबंधित असाच एक प्रश्न आणला आहे. अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही.
आपल्या मृत्यूनंतर शरिराचा कोणता भाग 10 वर्षं जिवंत राहतो तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर आहे आपल्या ह्दयाला चालवणारं हार्ट वॉल्व म्हणजे झडप असं आहे. ते 10 वर्षं जिवंत ठेवता येतं.
मृत्यूनंतर मानवी हाडे किती काळ सुरक्षित ठेवता येतात? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का? मानवी हाडे आणि त्वचा सुमारे 5 वर्षे जिवंत ठेवता येतात.
मृत्यूनंतर डोळ्यांचं किती काळात प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे? हे तुम्हााल माहिती आहे का...मृत्यूनंतर 6 तासांच्या आत एखाद्या व्यक्तीचे डोळे काढून टाकणे आवश्यक आहे.
मृत्यूनंतर, यकृत 12 तास जिवंत राहते. या काळात, ते प्रत्यारोपण करावे लागते.
माणसाच्या शरिरावरील केस आणि नखं 6 तास जिवंत राहतात.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)