PHOTOS

Best Smartphones : तगडे टॉप 5 स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फीचर्स

Best Smartphones : आज गुढीपाडवा. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा पहिला दिवस आणि त्यामुळे पहिला सणही. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असल्याने आज गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नव्या गोष्टींना सुरुवात केली जाते. घरोघरी दारी गुढी उभारुन विजय आणि समृद्धीचं प्रतीक साजरं केलं जातं.  चैत्र नवरात्री 2023 चा शुभ मुहूर्त सुरु झाला आहे आणि या काळात बरेच लोक त्यांच्या कुटुंबियांना आणि जवळच्या आणि प्रियजनांना भेटवस्तू देत असतात. तंत्रज्ञान प्रेमी असलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी स्मार्टफोन ही चांगली भेट ठरु शकते. विशेषत: ज्याला फोनची गरज आहे. त्यामुळे, जर तुम्ही या नवरात्रीमध्ये टेक गिफ्ट्स शोधत असाल तर 20 हजारांखालील टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. या यादीत सॅमसंग, रियलमी आणि मोटोरोलाच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.

Advertisement
1/5
Samsung Galaxy F23 5G
Samsung Galaxy F23 5G

सॅमसंग स्मार्टफोन सध्या बाजारात सर्वोत्तम मानले जातात. जर तुम्ही 5G फोन शोधत असाल तर Samsung Galaxy F23 5G हा चांगला पर्याय असू शकतो. 20 हजार पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 750G ला सपोर्ट करत आहे. यामध्ये तुम्हाला 50MP सह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 5000mAh बॅटरी आहे.

2/5
Poco M4 Pro 5G
 Poco M4 Pro 5G

Xiaomi ची Poco चांगला फोन आहे. Poco M4 Pro 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. फोन MediaTek Helio G96 द्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. 20 हजार पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.

3/5
Realme 10 Pro 5G
Realme 10 Pro 5G

Realme 10 Pro 5G प्रीमियम हा एक चांगला फोन आहे. यात 6.7-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरला सपोर्ट करतो. 20 हजार पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.108MP प्राथमिक कॅमेरा आणि 2MP मॅक्रो लेन्स असेल. यामध्ये 5000mAh ची बॅटरी देखील उपलब्ध आहे.

4/5
Motorola G62 5G
Motorola G62 5G

Motorola G62 5G हा एक उत्तम कमी बजेटमधील फोन आहे. 20 हजार पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. हे 50MP च्या ट्रिपल कॅमेरा सेटअपसह उपलब्ध आहे. यात फ्रंटला 16MP सेल्फी कॅमेरा आहे.

5/5
iQOO Z6 5G
iQOO Z6 5G

एक चांगला स्मार्टफोन आहे. iQOO Z6 5G हा देखील भेट देण्यासाठी चांगला पर्याय आहे. फोन Qualcomm Snapdragon 695 5G चिपसेटला सपोर्ट करत आहे. फोनमध्ये 120HZ रिफ्रेश रेटसह 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP ऑटोफोकस प्राथमिक कॅमेरा उपलब्ध आहे. 20 हजार पेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे.





Read More