PHOTOS

GK: तुम्ही वापरत असलेला टूथपेस्ट नॉनव्हेज असू शकतो? घरीच ओळखा ‘Veg’ आणि ‘Non Veg’मध्ये फरक

Toothpaste Veg or Non Veg: आपण जेव्हा जेव्हा टूथपेस्ट खरेदी करतो तेव्हा त्याची चव, ब्रँड आणि कधीकधी डॉक्टरांच्या सल्ल्याला प्राधान्य देतो. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचा टूथपेस्ट नॉनव्हेज अर्थात मांसाहारी देखील असू शकतो? कसं ते जाणून घेऊयात. 

 

Advertisement
1/8

How to know toothpaste is veg or non: तुम्ही वापरत असलेला टूथपेस्ट नॉनवेज असू शकतो? घरीच ओळखा ‘वेज’ आणि ‘नॉनवेज’मध्ये फरक आपण दात घासायला दररोज टूथपेस्ट वापरतो, पण तो खरंच शाकाहारी (वेज) आहे का?, हे आपण कधी तपासतो का? 

2/8

साधारणतः आपण टूथपेस्ट खरेदी करताना त्याची चव, ब्रँड, व्हाइटनिंग दावा किंवा डॉक्टरची शिफारस पाहतो. पण त्यामध्ये वापरलेले घटक पदार्थ पाहतो का? अनेकांना हे माहितीही नसतं की काही टूथपेस्ट पूर्णतः शाकाहारी नसतात, म्हणजे त्यात प्राणिज घटकांचा वापर केलेला असतो.

 

3/8

होय, काही टूथपेस्टमध्ये प्राण्यांपासून मिळणाऱ्या घटकांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ग्लिसरीन हा एक मुख्य घटक आहे, जो कधी कधी वनस्पतींपासून बनवतात तर कधी प्राण्यांच्या चरबीपासून. शिवाय, कॅल्शियम फॉस्फेट, जिलेटिन किंवा स्टीअरिक अ‍ॅसिड हे घटक प्राणिज स्रोतांपासून मिळू शकतात.

 

4/8

तरीही, बहुतांश टूथपेस्टमध्ये फ्लोराईड, सिलिका, कॅल्शियम कार्बोनेट आणि ग्लिसरीन हे सामान्य घटक असतात. पण ग्लिसरीनचा स्रोत काय आहे, हे स्पष्ट नसेल, तर तो नॉनवेजही असू शकतो.

 

5/8

आपण खरेदी करताना टूथपेस्टच्या पॅकेजिंगवर काही गोष्टी पाहून वेज-नॉनवेज ओळखू शकतो. यासाठी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) ने काही नियम बनवले आहेत.

 

6/8

जर टूथपेस्टवर हिरवा डॉट असेल तर तो शाकाहारी (वेज) आहे. म्हणजे त्यात कोणताही प्राणिज घटक वापरलेला नाही. जर तपकिरी किंवा लाल डॉट असेल तर समजून जा की त्यामध्ये प्राणिज घटक वापरले गेले आहेत, म्हणजे तो नॉनवेज आहे.

7/8

टूथपेस्टच्या पॅकवर घटकांची यादी असते. त्यात Gelatin, Stearic Acid, Calcium Phosphate असे काही घटक दिसले, तर त्यांच्या स्रोताकडे लक्ष द्या. जर ते प्राणिज स्रोताचे असतील आणि स्पष्ट नमूद नसेल, तर सावध व्हा.

 

8/8

जर तुमच्या मनात शंका असेल, तर संबंधित ब्रँडच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळवा. अनेक कंपन्या त्यांच्या प्रॉडक्टमध्ये काय वापरले गेले आहे हे स्पष्ट करतात किंवा त्यांच्या कस्टमर केअरला कॉल करूनही विचारू शकता.

 





Read More