PHOTOS

काय आहे W/L बोर्डाचा अर्थ; 'हे' साइन बोर्ड दिसताच का वाजतो रेल्वेचा भोंगा?

Indian Railway Facts: रेल्वे ही भारताच्या सगळ्या बाजूंना जोडण्याचा प्रयत्न करते. तर त्यातही भारतीय रेल्वे हा जगातील सगळ्यात मोठं असलेलं असं चौथ रेल्वे नेटवर्क आहे. पण आता त्यातही रोज लाखो प्रवासी या रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेनं प्रवास करताना तुम्ही अनेकदा रुळाच्या बाजुला पाहिलं असेल की W/L किंवा मग सी/फा लिहिलेला बोर्ड दिसतो. 

 

Advertisement
1/8

त्यासोबत तुम्ही लक्ष दिलं असेल तर हा बोर्ड पाहिल्यानंतर रेल्वे शीटी वाजवते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की W/L या साइनचा अर्थ काय आहे? भारतीय रेल्वे जगातील चौथं सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. 

2/8

रोज भारतात 13000 पेक्षा जास्त ट्रेन या एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी प्रवाशांना घेऊन जातात. ज्यात कोटीच्या संख्येनं प्रवासी प्रवास करतात. त्यातही इतक्या प्रवाशांना रोज घेऊन जाणाऱ्या रेल्वे सेवेत भारतीय रेल्वे ही जगातील सगळ्यात टॉपला आहे.  

3/8

जर तुम्ही कधी भारतीय रेल्वेची ट्रेनन प्रवास करतात तर तुम्ही रुळाच्या आजुबाजूला वेगवेगळे साइनबोर्ड्स पाहिले असतील. अशात एक साइनबोर्ड W/L या किंवा सी/फा असं लिहिलेला असतो. 

4/8

जर तुम्ही या बोर्ड्सकडे लक्ष दिलं असेल तर W/L या किंवा सी/फा हा बोर्ड पाहिल्यावर रेल्वे मोठ्या मोठ्यानं हॉर्न वाजवते. मग असं का करते हा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? 

5/8

W/L मधील W चा अर्थ शीटी आणि L चा अर्थ लेव्ह क्रॉसिंग होतो. हिंदीमध्ये लिहिलेल्या सी/फा मधील सी चा अर्थ सीटी आणि फा चा अर्थ फाटक आहे. हे साइन बोर्ड रेल्वे फाटक येण्या आधी लावण्यात आले आहेत. 

6/8

याचा अर्थ पुढे रेल्वे फाटक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लोकोपायलटला माहित नसतं की फाटक गेटवर लावण्यात आलं आहे की नाही. त्याशिवाय फाटकावर गाडी अडकलेली नाही ना किंवा अडकू नये यासाठी हा हॉर्न वाजवण्यात येतो. 

7/8

तर फाटकाच्या इथे आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला माहिती देण्यासाठी अशा प्रकारे जोरा जोरात हॉर्न वाजवतात. 

8/8

(All Photo Credit : Social Media)





Read More