PHOTOS

Richest Religion in World: कोणत्या धर्माच्या अनुयायांकडे सर्वात जास्त संपत्ती? 90% लोकांचा अंदाज ठरला चुकीचा

Richest Religion in World: जागतिक स्तरावर सर्वात जास्त संपत्ती कोणत्या धर्माकडे तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या मनात कधी हा प्रश्न पडला का?, जर नसेल तर आम्ही विश्वसनीय स्त्रोतांच्या आधारे त्याचे उत्तर देणार आहोत. खरं तर, एका जागतिक अभ्यासातून कोणत्या धार्मिक गटाकडे सर्वात जास्त संपत्ती सांगणयात आलंय. या अभ्यासाचा अहवाल जगातील अनेक धर्मांमधील आर्थिक असमानता आणि धार्मिक समुदायांच्या आर्थिक परिणामांबद्दल महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी प्रदान करणारा आहे. 

Advertisement
1/11

जगभरातील 8 अब्जाहून अधिक लोक वेगवेगळे धर्म, रीतिरिवाज आणि त्यांच्या स्वतःच्या परंपरा पाळतात. हे सर्व लोक वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीतून आले असून ज्यामध्ये अतिश्रीमंत, श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. 

2/11

जेव्हा जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत अब्जाधीशांचा उल्लेख केला जातो तेव्हा टेस्लाचे भाऊ एलोन मस्क, अमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस, चॅरिटी फाउंडेशनचे मालक बिल गेट्स, फेसबुक-इन्स्टाग्रामचे मालक मार्क झुकरबर्ग यांची नावं घेतली जातात. हे सर्व लोक केवळ सर्वात श्रीमंत लोकांमध्येच नाहीत तर जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पाहिला मिळतो. 

3/11

आपण अनेकदा श्रीमंत लोकांकडे एकाच चष्म्यातून पाहतो, पण वेगवेगळ्या धर्मांच्या अनुयायांकडे असलेली सामूहिक संपत्ती एक व्यापक चित्र सादर करणारे आहे. अलिकडच्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून असे दिसून आलं की, जागतिक स्तरावर कोणत्या धार्मिक गटाकडे सर्वात जास्त संपत्ती आहे. हा अभ्यास अहवाल जागतिक आर्थिक असमानतेबद्दल काही मनोरंजक माहिती देणारा आहे. 

4/11

या अभ्यासानुसार, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी, जगात सर्वात जास्त संपत्ती बाळगतात. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांची एकूण संपत्ती 107.28 ट्रिलियन डॉलर्स आहे. जी जगाच्या एकूण संपत्तीच्या अंदाजे 55% आहे. या वर्चस्वाचे श्रेय प्रामुख्याने अमेरिका, कॅनडा, युरोपीय देश आणि ऑस्ट्रेलिया सारख्या विकसित देशांना जाते, जिथे ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची लोकसंख्या बहुसंख्य असल्याचे पाहिला मिळतं. 

5/11

हिंदू समुदायाची एकूण संपत्ती $655 अब्ज असून ही संख्या मुस्लिम समुदायापेक्षा खूपच कमी असल्याच समोर आल आहे. ही तफावत कदाचित अनेक हिंदू विकसनशील किंवा उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये राहतात म्हणून असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

6/11

हे देखील आश्चर्यकारक आहे की जगभरातील लोकसंख्या कमी असूनही, यहुदी धर्माचे अनुयायी म्हणजेच ज्यू समुदायाकडे जगभरात मोठी संपत्ती आहे. म्हणजेच ज्यूंकडे $2.079 ट्रिलियन किमतीची मालमत्ता आहे आणि त्यांच्याकडे हिंदू समुदायापेक्षा तिप्पट संपत्ती आहे. 

 

7/11

संरक्षण कौशल्यांसह शिक्षण, तंत्रज्ञान आणि वित्त व्यवस्थापन कौशल्ये यासारख्या क्षेत्रात ज्यूंच्या मजबूत उपस्थितीमुळे हे घडल्याच पाहिला मिळालं. ज्यू अब्जाधीशांच्या यादीत अनेक नावे ठळकपणे घेता येणार आहे. ज्यू समुदायाचा सामाजिक, आर्थिक प्रभाव आणि योगदान लक्षणीय आहे, विशेषतः युनायटेड स्टेट्समध्ये ते प्रकर्षाने जाणवतं. 

8/11

जागतिक संपत्तीचा मोठा भाग अशा व्यक्तींकडे आहे ज्यांचा कोणताही धार्मिक संबंध नाही. अलीकडील अभ्यासातील आकडेवारीनुसार, धार्मिक नसलेल्या व्यक्तींकडे एकत्रितपणे $67.832 ट्रिलियन इतकी संपत्ती आहे, जी जगाच्या एकूण संपत्तीच्या 34.8% आहे. 

 

9/11

यावरून असे दिसून येते की ज्या श्रीमंतांसाठी पैसा हाच धर्म आहे आणि ते इतर कोणत्याही धार्मिक श्रद्धेचे पालन करत नाहीत अशा लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ पाहिला मिळते.

10/11

अमेरिकेपासून ते पाश्चात्य देशांमध्ये, विशेषतः युरोपीय देशांमध्ये आणि सातही खंडांमध्ये राहणाऱ्या एकूण लोकसंख्येचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा धक्कादायक खुलासा पाहिला मिळतो. ज्यामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेले देश आणि त्याचप्रमाणे प्रत्येक धर्माचे अनुयायी असलेल्या देशांचा क्रमांक लागतो. अर्थात, या अभ्यासाच्या अहवालात नास्तिक श्रीमंत लोकांचा डेटा देखील समाविष्ट आहे.

11/11

जागतिक संपत्तीच्या बाबतीत इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे, मुस्लिमांकडे एकत्रितपणे $11.335 ट्रिलियन किमतीची जागतिक संपत्ती आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 25% लोकसंख्या असूनही, मुस्लिमांचा जागतिक संपत्तीत दुसरा सर्वात मोठा वाटा आहे.





Read More