why skyscrapers are made of glass: शहरांमधील बहुतेक उंच इमारती काचेच्या का असतात? जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल, तर आज आम्ही तुम्हाला याचे उत्तर देणार आहोत.
अगदी सगळ्याच शहरात वरती पाहिलं की उंचच उंच इमारती दिसतात. त्या इमारतीपैकी बहुतेक काचेच्या बनवलेल्या असतात, ज्या दिसायला खूप सुंदर दिसतात. अनेकांना असे वाटते की या उंच इमारती काचेपासून बनवण्याचे कारण फक्त त्यांचे सौंदर्य असेच आहे.
पण खरे तसे नाही. फक्त सौंदर्य हेच कारण नाही. उंच इमारतींमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात काचेचा वापर करण्यामागे अनेक मोठी आणि वगेळी कारणे आहेत, जी कदाचित आजही अनेकांना माहित नसतील.
उंच इमारतींमध्ये काचेचा वापराचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विजेची बचत होते. खरं तर, काच पारदर्शक असते आणि त्यामुळे इमारतीत प्रकाशही प्रवेश करतो. यामुळे दिवसा कमी लाईट्स वापराव्या लागतात.
उंच इमारतींमध्ये बसवलेले काच एका विशिष्ट प्रकारच्या असतात. या काचांमुळे उष्णता आत जाण्यापासून रोखली जाते आणि थंडीच्या काळात उष्णता बाहेर जाऊ देत नाहीत. यामुळे एसी किंवा हीटर वापरण्याची जास्त आवश्यकता नसते आणि त्यामुळे बरीच वीज वाचते.
या काचेच्या इमारती अशा प्रकारे डिझाइन केल्या आहेत की त्या जोरदार वारा, भूकंप किंवा इतर दाबांना सहज तोंड देऊ शकतात. यांच्यात अशी ताकद असते की जे कोणत्याही हवामानाचा सामना करू शकतात आणि ओलाव्यामुळे त्या खराब होण्याची काळजी करण्याची गरज नाही.
बिल्डिंग काचेची असल्याने, ती तुम्हाला सहज आगीपासून सुरक्षित ठेवते. तसेच, आग लागल्यास, तुम्हाला बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. याशिवाय आगीमुळे इमारतीचे जास्त नुकसान होत नाही.
काचेच्या बिल्डिंगमध्ये धूळ आणि घाण कमी जमा होते. जमा झाली तरी सहज दिसून येत नाही. काचेच्या इमारती वीट किंवा दगडी भिंतींपेक्षा स्वच्छ करण्यासाठी कमी खर्च येतात आणि त्यांना दुरुस्तीची देखील आवश्यकता नसते.
अशा अनेक कारणांमुळे अनेक उंच बिल्डिंग या या काचेच्या असतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)