Gold Silver Price Today: इथं सोनं आणि चांदीचे दर पाहून मात्र अनेकजण एक पाऊल मागं येतात.
Gold Silver Price Today: दसरा आणि दिवाळीच्या या दिवसांमध्ये पेढ्यांवर जाऊन सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांची आणि अवाजवी खर्चापेक्षा दागिन्यांवर खर्च करणाऱ्यांची संख्या मोठी असते.
मागील काही काळापासून सोनं- चांदीचे दर कमी होत असल्याचं लक्षात आल्यामुळं अनेकांनीच सोनं खरेदीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे.
बुधवारप्रमाणंच गुरुवारीसुद्धा या दरांमध्ये विक्रमी घट नोंदवली जात आहे. एमसीएक्स एक्सचेंजसुद्धा सोन्याच्या कमी दरांनंच सुरु झाला. तर, चांदीच्या दरातही असंच चित्र पाहायला मिळालं.
इस्रायल आणि हमास यांच्या सुरु झालेल्या युद्धानंतर सोन्याच्या दरांमध्ये उसळी पाहायला मिळाली होती.
दिवाळीआधी मात्र हे दर कमी होत असल्यामुळं आता अनेकांनीच सोनं खरेदीला पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे.
एमसीएक्स एक्सचेंजवर गुरुवारी सोन्याच्या दरात 30 रुपयांची घट पाहायला मिळाली. ज्यामुळं हे दर प्रति तोळा 60,824 वर सुरु झाले. बुधवारी हाच आकडा 60,826 इतका होता.
वायदा बाजारात चांदीच्याही दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी चांदीचे दर प्रति किलोग्रामसाठी 71,799 रुपये इतके होते.