Gold Loan News:देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे.
सोनं हा भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. मुल जन्माला आल्यापासून ते मुलांचे लग्न, घरातील शुभकार्य, शुभमुहुर्त सर्ववेळेस थोडं का होईना सोनं खरेदी केलं जातं. सोन्याच्या किंमतीत सध्या उतार पाहायला मिळतोय.
अनेकदा लोकांना पैशांची गरज असते तेव्हा बॅंका, पतपेढ्या अशा विविध मार्गाने गोल्ड लोन घेतलं जातं.
देशामध्ये गोल्ड लोनचं मार्केट साधारण 15 लाख कोटींचं आहे. रिझर्व बॅंकेच्या आकड्यानुसार हे मार्केट गेल्या एका वर्षात 17 टक्क्यांनी वाढले आहे. सोन बाजारात लावण्यात येणाऱ्या अंदाजानुसार, 2029 मध्ये यामध्ये 12.22 टक्के वाढ होऊ शकते.
देशातील गोल्ड लोन मार्केटमध्ये संघटित क्षेत्रातील भागीदारी 40 टक्के इतकी आहे. हा आकडा 6 लाख कोटींच्या आसपास आहे. या हिशोबाने पाहायला गेलं तर गोल्ड लोन मार्केट साधारण 15 लाख कोटींचं आहे.
समोर आलेल्या रिपोर्टनुसार, 2029 पर्यंत गोल्ड लोनचा संघटित व्यवसाय साधारण 10 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यामध्ये बॅंकेची 40 टक्के आणि एनबीएफसीची 60 भागीदारी आहे.
भारतीय परिवारांकडे साधारण 27 हजार टन सोनं आहे. यातील 20 टक्के म्हणजेच 5300 टन सोनं तारणं ठेवण्यात आलंय.
गेल्या एका वर्षात सोन्याची किंमत 16.6 टक्क्यांनी वाढली आहे. तर गोल्ड लोनमध्ये साधारण 17 टक्क्यांनी वाढ झालीय. सलग चाललेला ट्रेण्ड पाहता आरबीआयने गोल्ड लोन देणाऱ्या बॅंका आणि एनबीएफसीतील नियम कडक केले आहेत.
यावेळेस सोन्याची किंमत सर्वोच्च स्थानी आहे. दिल्ली मार्केटमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66 हजार 914 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. एका दिवसात सोन्याच्या किंमतीत 1225 रुपयांची वाढ पाहायला मिळाली.