Gold Rates Latest News : आपल्या खिशाला परवडेल अशा स्वरुपात सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे.
Gold Rates Latest News : अशा या सोन्यातील गुंतवणुकीसाठीही बरीच मंडळी प्राधान्य देताना दिसतात. तुम्हाला ही गुंतवणूक चांगला परतावा मिळवून देऊ शकते.
सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार आहेत. कारण, येत्या काळात सोन्याचे दर 70 हजारांचा आकडा ओलांडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुढील वर्षाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर मोठ्या फरकानं वाढणार असून, आतापर्यंत यामध्ये गुंतवणूक केलेल्यांना त्याचा फायदा वाढीव परताव्याच्या स्वरुपात घेता येणार आहे.
मध्य पूर्वेमधील राजकीय अस्थिरतेनंतर सोनं खरेदीला प्राधान्य मिळाल्याची बाब समोर आली आहे. त्यातच डॉलरची किंमत, व्याजदर, खनिज तेलाचे दर या साऱ्याचा परिणामही सोन्याच्या दरांवर होणार आहे.
एका निरीक्षणातून समोर आलेल्या माहितीनुार मागील तीन वर्षांच्या सोन्याच्या गुंतवणुकीचा आढावा घेतल्यास 20 टक्के परतावा मिळाल्याचं निष्पन्न झालं आहे.
जागतिक स्तरावरील काही घटना या दरांवर परिणाम करताना दिसतील. यामध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पद निवडणुका, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरातील कपात या साऱ्याचा समावेश आहे.
त्यामुळं तुम्ही सोनं घ्यायचा विचार करत असाल तर आताच संधी साधा नाहीतर हे दर आवाक्याबाहेर जातील...