गुगल नेहमीच विविध दिवसांचे महत्त्व पटवून देण्यासाठी डूडल (Google Doodle) वरुन अनोखी थीम बनवत असते अशीच थीम यंदा गूगलने बबल टी साठी बनवली आहे.
भारतात सध्या 'बबल टी'चा ट्रेंड सुरु आहे. कोविड काळात इंटरनेटच्या माध्यामातून ही बबल टी भारतीयांच्या घराघरात पोहचली.
'बबल टी' हे तैवान या देशाचे पेय आहे. यामध्ये दूध, बर्फ, फळांच्या फ्लेवर्सचा जेली बेस आणि टुटी फ्रुटी वापरुन बनवली जाते
गूगल ने बबल टी बद्दल असलेली वाढती लोकप्रियता पाहून हा डूडल शेअर केला. यामध्ये डूडलवर गेम देखील सादर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही डिजिटल बबल टी बनवू शकाल.
29 जानेवारी 2020 ला या बबल टीची इमोजी What's app वर टाकण्यात आली आणि त्याच दिवसाच्या उद्देशाने आज गूगलने बबल टी चा बर्थडे साजरी करत अनोखे डूडल बनवले.
हे पेय सिंगापूर, जपान आणि दक्षिण कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. आता भारतातही या बबल टीनं चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे.