गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.
Google Map New Feature: गाडीने दुरवरचा प्रवास करताना गुगल मॅप्सची मोठी मदत होते. कधी डावीकडे वळायचंय, किती अंतरानंतर उजवीकडे वळायचंय, वाटेत कोणती महत्वाची ठिकाणं आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे गुगल मॅप्स आपल्याला देतो. असं असलं तरी गुगल मॅप्समुळे अनेक वेळा मोठ्या समस्या निर्माण होतात.
आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं असतं पण गोंधळामुळे आपण दुसरीकडे कुठेतरी भटकत राहतो. विशेषत: ज्या मार्गावर उड्डाणपूल आहेत, त्या मार्गावर तर समस्या आणखी मोठी होते. पण आता असं होणार नाहीय.
कारण गुगलने आपल्या मॅप्समध्ये मोठे बदल केले आहेत. गुगल मॅप्समध्ये फ्लायओव्हर अलर्ट फीचर आलंय. ज्यामध्ये कोणता फ्लायओव्हर वापरायचा आहे आणि कोणता नाही हे सांगितलं जातं.
गुगल मॅपची ही सुविधा सर्वांसाठी खूपच उपयुक्त असे आहे. उड्डाणपुलांची माहिती नसल्यामुळे वाहन चालकाला मनस्तापाला सामोरे जावे लागते. पण आतागुगल मॅपवरील टेक फ्लायओव्हर फीचर फ्लायओव्हर येण्यापूर्वीच तुम्हाला याची माहिती देते.
आपल्याला पुढे कोणता उड्डाणपूल वापरायचा आहे आणि कोणता नाही, हे आपल्याला अॅपमुळे कळते. या फिचरमध्े थ्रीडी ग्राफिक्स असल्याने स्पष्ट व्हिज्युअल दिसतात. त्यामुळे ड्रायव्हरला कोणता फ्लायओव्हर घ्यावा लागेल आणि गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी कोणता फ्लायओव्हर टाळावा लागेल, हे दिसते.
मॅप अपडेट करताना गुगलने अनेक नवीन फीचर्स यात जोडले आहेत. ज्यामुळे यूजर्सना ड्रायव्हिंग करताना खूप मदत होणार आहे. गुगलने नेव्हिगेशन फिचर अपडेट केलं. आगामी वळणाआधी योग्य लेनबद्दल माहिती देण्यासाठी व्हिज्युअल इंडिकेटर देण्यात आले आहे. नव्या अपडेटमुळे रहदारी चिन्हे, क्रॉसवॉक आणि लेन प्रतिबंध यांसारखी माहिती देखील युजर्सना मिळणार आहे. भारतासह अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहेत.
यासोबतच पार्किंगचे ठिकाण, इमारतीचे प्रवेशद्वार आदी माहितीही नकाशावर उपलब्ध होणार आहे. गुगल मॅपवरही हवामानाची माहिती उपलब्ध असेल. कमी दृश्यमानता, धुके, बर्फ, खराब रस्ता आणि पूर यांसारख्या रस्त्यावरील कठीण परिस्थितीची माहिती देखील उपलब्ध होईल. गुगल मॅपचे हे वैशिष्ट्य चर्चेत आहे.
आजकाल गुगल मॅपच्या फ्लायओव्हर फीचरची खूप चर्चा आहे. एका लिंक्डइन यूजर्सने म्हटलंय की, फ्लायओव्हर फिचर आणण्याची कल्पना आणणाऱ्या कर्मचाऱ्याला गुगलने'दिवाळी बोनस' द्यावा. गुगलचे वैशिष्ट्य खूप फायदेशीर आहे. थ्रीडी व्हिज्युअल्स असल्याने युजर्सचा गोंधळ होत नाही. आता युजर्स लिंक्डइन पोस्टवरही प्रतिक्रिया देत आहेत. फीचर तयार करणाऱ्या प्रत्येकाला दिवाळी बोनस द्यायला हवी. प्रत्येक युजर आपापल्या परिने फिचरचे कौतुक करत आहेत.