Google Maps New Feature : तुम्ही ज्या शहरात राहता त्या शहराचा चेहरामोहरा 30 वर्षांपूर्वी कसा होता माहितीये? काय सांगता 30 वर्षांपूर्वी असं दिसायचं तुमचं शहर? Google Maps च्या एका फिचरची कमाल, क्षणात Time Travel
Google Time Travel feature: आपण ज्या शहरात राहतो ते शहर 30 ते 40 वर्षांपूर्वी नेमकं कसं दिसायचं हे तुम्हाला माहितीये? बहुधा माहित नसेलही आणि आता गेलेली वेळ परतही आणता येणं अशक्यच. तर मग आपलं शहर तीन ते चार दशकांपूर्वी नेमकं कसं दिसायचं हे कळणार तरी कसं? या प्रश्नाचं उत्तर आहे गुगल मॅप.
गुगल मॅप आणि गुगल अर्थ इतकं कमाल विकसित झालं आहे की यातील नवं फिचर अनेकांनाच थक्क करत आहे. या फिचरच्या माध्यमातून युजर्सना कोणत्या Location अर्थात ठिकाणाची जुनी दृश्य पाहता येणार आहेत.
म्हणजेच फोन असो किंवा कंप्यूटर, तुम्ही कोणत्याही माध्यमातून शहराच्या भूतकाळात डोकावू शकता, एका अनोख्या पद्धतीनं टाईम ट्रॅवलचा अनुभव घेऊ शकता.
गुगल ब्लॉग पोस्टच्या माहितीनुसार हे फिचर लंडन, बर्लिन आणि पॅरिससारख्या प्रसिद्ध शहरांची 1930 पर्यंत जुनी छायाचित्र सादर करण्यात सक्षम आहे.
हे फिचर वापरण्यासाठी सर्वप्रथम गुगल मॅप्स किंवा गुगल अर्थ सुरू करा. यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणाचं जुनं रुप पाहायचं आहे त्याचं नाव सर्च करा.
स्क्रीनवर दिसणाऱ्या 'लेअर्स' ऑप्शनवर क्लिक करा आणि तिथं 'टाईमलॅप्स' पर्याय निवडा. या सोप्या पद्धतीनं तुम्ही एखादं ठिकाण कैक वर्षांपूर्वी नेमकं कसं दिसायचं हे सहजपणे पाहू शकता.
टाईम ट्रॅव्हलच्या फिचरशिवाय गुगलनं आपल्या स्ट्रीट व्हू फिचरमध्येही बदल केले असून, त्यात काही नवे फोटो जोडण्यात आले आहेत. या अपडेटनंतर आता 280 बिलियनहून अधिक फोटो गुगलच्या स्ट्रीट व्ह्यूमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात.