Google Pay Convenience Fee: पेटीएम आणि फोनपे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल रिचार्जसाठी चार्ज करत आहेत. मोबाईल रिचार्जवर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Google Pay Convenience Fee: तुम्ही इन्स्टंट पेमेंट अॅप गुगल पेद्वारे तुमचा मोबाइल रिचार्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
गुगल पेने यूपीआय वापरून त्यांचा मोबाईल रिचार्ज करणाऱ्या यूजर्सर्त्यांकडून सुविधा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे.
याअंतर्गत कंपनीकडून 3 रुपयांपर्यंत सुविधा शुल्क आकारले जात आहे. हे शुल्क जीपेद्वारे प्रीपेड प्लॅन रिचार्ज करणाऱ्या यूजर्संना लागू आहे. यापूर्वी ही सुविधा पूर्णपणे मोफत होती. यूजर्सना फक्त टेलिकॉम ऑपरेटरकडून आकारले जाणारे पैसे द्यावे लागत होते.
तुम्ही नुकतेच रिचार्ज केले असेल आणि आतापर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष दिलेले नसेल. पण आता तुम्ही निरिक्षण केले तर गुगल पे देखील पेटीएम आणि फोनपेच्या यादीत सामील झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.
पेटीएम आणि फोनपे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल रिचार्जसाठी चार्ज करत आहेत. मोबाईल रिचार्जवर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एका यूजरने जीपेद्वारे मोबाइल रिचार्ज केल्यावर ही बाब समोर आली. यूजरने 11 नोव्हेंबर रोजी पहिले रिचार्ज केले होते. ज्यासाठी त्याच्याकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले गेले नाही. जीपेद्वारे 100 रुपयांपर्यंतचा रिचार्ज केल्यास कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागले नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
याशिवाय 100 ते 200 रुपयांच्या रिचार्जवर 2 रुपये सर्व्हिस चार्ज आणि 300 रुपये किंवा त्याहून अधिकच्या रिचार्जवर 3 रुपये आकारले जात आहेत. जर तुम्हाला असे शुल्क टाळायचे असेल तर तुम्ही ऑपरेटरच्या वेबसाइटवर जाऊन थेट रिचार्ज करू शकता.
पेटीएम आणि फोनपेसारख्या पेमेंट सेवा पुरवणाऱ्या अॅप्सच्या नियमांचे पालन करण्यासाठी गुगल पेने आपले धोरण बदलले आहे.