Google Search : गुगलवर अवघ्या काही सेकंदात जगभरातील सर्वच गोष्टींची माहिती आपल्याला मिळते. पण गुगलचा वापर जपून केला नाही तर ते धोक्याचं ठरू शकतं, हे तुम्हाला माहीत आहे का? गुगलवर अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्च (google search) केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो.
अनेक वेळा लोक अशा गोष्टींचा शोध घेतात, ज्याला काही अर्थ नसतो. पण असे करणे तुम्हाला महागात पडू शकते. जसे की बॉम्ब कसे बनवायचे? याचा चुकूनही शोधू घेऊ नका. या कामांवर सायबर सेलची नजर असते. सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकतात. ज्यामध्ये तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
सोशल मीडिया किंवा गुगलवर खाजगी फोटो किंवा व्हिडिओ लीक करणे हा देखील गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे तुरुंगवासही होऊ शकतो.
गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येते. हे अजिबात करू नका. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही.
भारत सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत अतिशय कडक आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न शोधणे, पाहणे किंवा शेअर करणे हा गुन्हा आहे. उल्लंघन केल्याचे आढळल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
काही अशी प्रकरणे असतात ज्यामध्ये पिडीतेचे नाव हे लपवून ठेवले जाते. परंतु अशी अनेक लोक असतात, जे गुगलवर या पिडीत लोकांची फोटो आणि नाव शोधत असतात आणि ही माहिती मिळताच ते आॅनलाईन पोस्ट देखील टाकत असतात. परंतु अशा लोकांवर पोलिसांची नजर पडल्यास त्यांच्यावर थेट कारवाई होऊ शकते.