अशा अनेक नोकऱ्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एखाद्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यापेक्षाही चांगला पगार मिळू शकतो.
Government Job: सध्या खासगी क्षेत्रातील नोकरी टिकण्याबद्दल अनेकांना विश्वास नाही. त्यामुळे चांगला पगार आणि सुरक्षित नोकरीसाठी तरुण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. पण सरकारी नोकऱ्यांसाठी तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावी लागले. खूप मेहनत घ्यावी लागते.
आयएएस हे देशातील सर्वात प्रतिष्ठित सरकारी पद मानले जाते, IAS अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला यूपीएससी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला दरमहा 56 हजार 100 रुपये इतका पगार मिळतो. त्यानंतर साधारण 8 वर्षांमध्या हा पगार 1 लाख 31 हजार 249 रुपयांपर्यंत वाढू शकतो. योबतच आयएएस अधिकाऱ्याला सरकारी निवास, वाहतूक अशा अनेक सुविधा मिळतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून ग्रेड B अधिकाऱ्यांची भरती केली जाते. या पदावर निवड झालेल्यांना दरमहा बेसिक पगार 55 हजार 200 रुपये मिळतो. त्यामुळे संपूर्ण वेतनासह हा आकडा दरमहा 1 लाख 08 हजार 404 इतका जातो.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीमध्ये नोकरी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा 56 हजार 100 इतका पगार मिळतो. त्यांना विविध भत्तेदेखील दिले जातात.
इस्रो आणि डीआरडीओ मधील इंजिनीअरिंग पदे सोशल रिसर्च ऑफिसर - C ला L-10 पे स्केलनुसार दरमहा 56 हजार 100 ते 1 लाख 77 हजार 500 इतका पगार मिळतो.
भारतीय वन सेवामध्ये रुजू झालेल्या अधिकाऱ्यांना सुरुवातीचा पगार 56 हजार 100, रु. पर्यंत असतो. तो वाढत जाऊन पुढे 2 लाख 25 हजारपर्यंत जातो. यासोबतच्या त्यांना विविध लाभ आणि भत्तेदेखील दिले जातात.
वेगवेगळी सरकारी पदे भरण्यासाठी एसएससी सीजीएल परीक्षा घेतली जाते. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 25 हजार 500 ते 1 लाख 51 हजार 100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.
सहाय्यक प्राध्यापक पद हे प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराचे म्हणून ओळखले जाते. यांना मॅट्रिक्स लेव्हल-10 नुसार पगार मिळतो. जो 57 हजार 700 रुपयांपासून सुरु होतो. ते 1 लाख 82 हजार 400 रुपये आणि इतर भत्ते असा मिळतो.
PSUs द्वारे उच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्या ऑफर केल्या जातात. ज्यात इंजिनीअर्सना E2 ग्रेडनुसार पगार मिळतो. 50 हजार ते 1 लाख 60 हजार आणि इतर भत्ते असा पगार त्यांना दिला जातो.
यूपीएससी परीक्षेतून आयएफएस अधिकारी,अवर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची निवड होते. त्यांना मिळणारा पगार लाखाच्या घरात असतो. आकर्षक पगारासह विविध पेस्केल, विशेष विदेशी भत्ते दिले जातात.
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना चांगला पगार मिळतो. ज्युनिअर रेसिडंट्सना मिळणारा सुरुवातीता पगार हा 52 हजार ते 53 हजारपर्यंत असतो. यानंतर त्यांच्या अनुभव आणि कौशल्यानुसार तो वाढत जातो.