Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात
चहा पावडरमध्ये नायट्रोजन , पोटॅशियम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण असतं आणि चहाच्या पानांचा रंग काळा असतो त्याने केस काळे करणं आणखी शक्य आहे.
चहाची पानं थेट न लावता त्याचं पाणी उकळून ते वापरू शकता. लवकर परिणाम हवा असेल तर यात कॉफी मिसळू शकता.
हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळू द्यावं, आता गॅस बंद करून रूम टेम्परेचरला थंड होऊद्या.
या चहाच्या पाण्याने केस धुवा, या दरम्यान शॅम्पू लावू नका. आता तुम्ही ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करून पाहू शकता.