Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्येही भक्तिमय (Gudi Padwa Celebration in Marathi) वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर येथील मंदिरात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करण्यासाठी नानाविध (Pandharpur Vithu Rakhumai Mandir) फुलांचा वापर करण्यात आला आहे.
सध्या सगळीकडेच गुढीपाडव्याचे वातावरण आहे. त्यामुळे घरोघरी पाडव्याचा सण उत्साहात साजरा होतो आहे. पंढरपूरचे विठू-रखमाईचे मंदिरही फुलांनी सजले आहे.
(छाया - श्री विठ्ठल रखूमाई मंदिरे समिती, पंढरपूर (महाराष्ट्र))
विठू रखूमाईच्या मंदिरात केलेल्या या सजावटीसाठी या सजावटीसाठी शेवंती 450 किलो, झेंडू 100 किलो आणि गुलाब 50 गड्डी, पिंक कन्हेर 40 किलो, अस्तर 40 किलो वापरण्यात आला आहे. रांजणगाव मधील भाविक नानासाहेब पाचनकर यांनी ही फुलांची आरास केली आहे.
श्री विठ्ठल तुळशी अर्चन पूजेसाठी एका कुटुंबाला 2100 रुपये मंदिर समितीकडे भरावे लागतील आणि त्यानूसरा देवाची पूजा, दर्शन आणि प्रसाद यांचा लाभ भाविकांना घेता येईल.
मागील नऊ वर्षापासून बंद असलेल्या श्री विठ्ठल तुळशी अर्चन पूजा आज गुढी पाडवा मुहूर्तापासून सुरू झाल्या आहेत. मुक्ताईनगर मधील संत मुक्ताई संस्थांनचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना पहिली तुळशी अर्चन पूजा करण्याची संधी मिळाली होती. रोज तीस भाविकांना समिती कडे देणगी मूल्य भरून या पूजा करता येणार आहेत.
वर्षभरात गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा या मुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरील भागवत धर्माची पताका असणारा ध्वज बदलण्याची परंपरा आहे. समिती सदस्य शिवाजीराव मोरे आणि व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत आज विधिवत पूजन करून ध्वज स्तंभवर हा ध्वज फडकवला.