Gudi Padwa 2025 Gold Purchase: सोन्याचा दर 90 हजारांपेक्षा अधिकवर पोहोचलेला असतानाही मुंबईकरांनी किती सोनं खरेदी केलं आहे पाहिलं का?
ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दराने 92 हजार 700 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) एवढी पातळी गाठल्यानंतरही, मुंबईकरांनी नववर्षदिनी खरेदीचा शुभमुहूर्त गाठत दमदार सोनेखरेदी केली.
गुढी पाडव्याला तब्बल 778 कोटी रुपयांची सोने खरेदी मुंबईकरांनी केल्याची माहिती झवेरी बाजारातील विक्रेत्यांनी दिली आहे.
गुढी पाडव्याच्या दिवशी मुंबईकरांनी तब्बल 840 किलो सोन्याची खरेदी केल्याची माहिती झवेरी बाजारातील विक्रेत्यांनी दिली. मुंबईतील झवेरी बाजार हे सोन्याच्या व्यवहाराचे केंद्र आहे.
मुंबईसह महामुंबईतील सराफा व्यावसायिक झवेरी बाजारातून दागिने घडवून नेतात.
कच्च्या सोन्याची देशभरातील 60 टक्के उलाढालदेखील देखील झवेरी बाजारातूनच होते.
एरव्हीदेखील या बाजारात दररोज जवळपास 200 किलोच्या घरांत सोन्याची खरेदी-विक्री होते.
सणासुदीला हा आकडा 800 किलो किंवा त्याहून अधिक होतो. याच पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्यालादेखील दमदार खरेदी झाली.