Guess This Bollywood Flop Superstar: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांची दमदार अभिनयाने आजही प्रेक्षकांची मनोरंजन करतात. पण या बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता आहे जो फ्लॉप अभिनेती म्हणून ओळखला जातो. पण तो त्याच्या काळातील सुपरस्टार होता. त्याचे बहुतेक चित्रपट हे फ्लॉप ठरले. या अभिनेत्याची संपत्ती 400 कोटींच्या घरात आहे.
फोटोमध्ये दिसणारा हा चिमुकल्या त्याचा काळात एक प्रसिद्ध अभिनेता होता. पण त्याचा अभिनेयाच्या कारकिर्दीत अनेक चढ उताराचा सामना करावा लागला होता. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी या अभिनेत्याचे आयुष्यही संघर्षांनी भरलेले होतं. त्याने आपल्या अभिनयाने लोकांच्या मनात एक खास स्थान निर्माण केलं पण तो एक फ्लॉप अभिनेता ठरला होता.
हा अभिनेता केवळ चित्रपटांमध्येच नाही तर टीव्ही शोमध्येही झळकला होता. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांच्या 250 हून अधिक चित्रपटांपैकी त्यांनी सलग 30 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले, तरीही त्यांना सुपरस्टार म्हटलं जातं.
आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्तीबद्दल बोलत आहोत. त्यांनी 1976 मध्ये आलेल्या 'मृगल्या' या चित्रपटापासून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
त्यांच्या चित्रपटसृष्टीत एक मोठी कामगिरी मानली जाते. यांना उद्योगात एक विशेष ओळख मिळाली. यानंतर, जेव्हा त्याचा 'डिस्को डान्सर' चित्रपट आला आणि या अभिनेत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. अभिनेता 80 च्या दशकात सुपरस्टार बनला होता आणि प्रत्येक दिग्दर्शक त्याला त्याच्या चित्रपटात घेण्यास रांग लावली होती.
अभिनेत्याचा सुवर्णकाळ 80 च्या दशकात होता, पण 90 च्या दशकात त्याच्या चित्रपटांचे यश कमी झालं. सलग 33 चित्रपट अपयशी ठरल्यानंतरही अभिनेत्याने हार मानली नाही. रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूडमध्ये सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. मिथुन यांच्यानंतर हा विक्रम आणखी एका सुपरस्टार जितेंद्रच्या नावावर आहे. पण, असे असूनही, मिथुन चक्रवर्ती यांनी 50 हून अधिक हिट चित्रपट देखील अभिनेत्याने दिले आहेत. ज्यात 9 ब्लॉकबस्टर आणि 9 सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम आजही लोकांसाठी एक उदाहरण मानलं जातं.
अभिनेत्याने चित्रपटसृष्टीनंतर राजकारणाचं मैदानातही नशिब आजमावलं. 1989 मध्ये त्यांनी सलग 19 चित्रपट केले त्यामुळे त्यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्येही नोंदवले गेले आहे. आजपर्यंत कोणताही अभिनेता हा विक्रम मोडू शकलेला नाही. त्याने हे स्थान केवळ त्याच्या अभिनय आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. त्याने प्रत्येक आव्हान स्वीकारले आणि आपल्या कारकिर्दीला नवीन उंचीवर नेले. आजही त्यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात मेहनती आणि आक्रमक कलाकारांमध्ये केली जाते. त्यांनी 370 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.
अभिनेत्याच्या एकूण संपत्तीबद्दल बोललो तर अंदाजे 400 कोटींच्या घरात आहे. त्याच्याकडे मड आयलंड, उटी आणि मुंबईजवळ एक आलिशान फार्महाऊस आहेत. त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही खूप चर्चा असते कायम. त्यांना मिमोह, नमाशी, दिशानी आणि उष्म्या चक्रवर्ती ही चार मुलं आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे आणि अनेकदा त्यांच्यासोबत दर्जेदार वेळ घालवतो. मिथुन चक्रवर्ती यांचं जीवन हे सिद्ध करतं की खरी मेहनत कधीच व्यर्थ जात नाही.