Guru Chandal Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू गोचरला विशेष महत्त्व आहे. शनि गोचरनंतर राहूचा मानवी जीवनावर खोलावर परिणाम दिसून येतो. 30 ऑक्टोबरला राहू गोचर होणार आहे. पण तोपर्यंत काही राशींवर संकट कोसळणार आहे
गुरु चांडाल योगामुळे शिक्षण, धन आणि चारित्र्यावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. त्यामुळे काही राशींना खूप सतर्क राहवं लागणार आहे. मेष, वृषभ, सिंह, कन्या, वृश्चिक, कुंभ आणि मीन राशीवर सर्वाधिक या योगाचा परिणाम दिसून येणार आहे.
या राशीच्या लोकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. नातेसंबंधामध्ये तणाव आणि वादविवाद निर्माण होती. छोटे छोटे वादही टोकाला जातील. कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण होणार आहे. तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे.
या राशीच्या अकराव्या घरात हा योग निर्माण होत आहे. अकरावं घर धनाचं घर असल्याने आर्थिक नुकसान होणार आहे. वैवाहिक जीवनात अशांतता पसरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बदनामीची शक्यता आहे.
या राशीच्या आठव्या घरात हा योग जुळून येतं आहे. या लोकांनी आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. वैवाहिक जीवनात अडचणी येणार आहेत. वाहन चालताना काळजी घ्या अपघाताची शक्यता आहे. मन आणि जीभेवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होईल.
या राशीच्या पाचव्या घरात गुरु चांडाल योग निर्माण होतो आहे. घरामध्ये वाद निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात अडचणी येणार आहेत. आईची प्रकृती खराब होण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील दुसऱ्या घरात या योग तयार होत आहे. त्यामुळे 30 ऑक्टोबरपर्यंत तुमची मानसिक स्थिती गडबडणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होणार आहे. आयुष्यात नकारात्मक गोष्टींचा अधिक प्रभाव दिसणार आहे. अनावश्यक खर्च वाढणार आहे.
प्रत्येक गुरुवारी व्रत ठेवा आणि सूर्यास्तापर्यंत मीठाचं सेवन चुकूनही करु नका.
रोज केशर, हळद किंवा चंदनाचा तिलक कपाळावर नित्य नेमाने लावा.
नदी, तलावातील माशांना मूग किंवा उडीद खाऊ घाला. ही उपाय आठवड्यातून किमान दोनदा तरी करा.
गुरुवारी पिवळे कपडे घाला आणि पिवळ्या वस्तूंचं दान करा. त्याशिवाय रात्री दुर्गा सप्तशती पाठ करा. गुरुवारी रात्री बृहस्पति आणि राहूच्या मंत्राचा जप करा. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)