PHOTOS

Hair Wash: 'या'च दिवशी धुवा केस, कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त; महिलांनो विशेष लक्ष द्या

ज्योतिषविद्येमध्ये मानवी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. कोणत्या गोष्टींची कोणत्या वेळी आणि कशा पद्धतीनं काळजी घ्यावी इथपर्यंतची माहिती ज्योतिषविद्येमध्ये देण्यात आलेली आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींवरून इथं मार्गदर्शनही करण्यात आलं आहे. लहानसहान गोष्टींचेही दैनंदिन आयुष्यावर किती परिणाम होतात हेच यातून लक्षात येतं. केस धुण्याची सवय हासुद्धा त्यातात एक भाग. तुम्हाला माहितीये का, चुकिच्या पद्धतीनं केस धुतल्यास देवी लक्ष्मीची अवकृपा होते आणि नकारात्मक परिणामांचा सामना करावा लागतो. चला तर, जाणून घेऊयात केस धुण्याची योग्य वेळ काय... (Hair Wash Rules According to astrology )

Advertisement
1/6

ज्योतिषविद्येनुसार महिलांनी शुक्रवारी केस धुवावेत. या दिवशी देवी लक्ष्मी प्रसन्न होते.  त्यामुळं याच वारी केस धुवावेत. विशेष म्हणजे महिलांसाठी हे फार लाभदायक असतं. शुक्रवारी केस कापणंही फायद्याचं असतं. 

2/6

ज्योतिषविद्येनुसार अविवाहित महिला आणि कुमारीकांनी बुधवारी केस धुवू नयेत. या वाराला केस धुण्याची चूक केल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

 

3/6

गुरुवारचं म्हणाल तर, या दिवशी केस धुवू नयेत. गुरुवारी केसांवर पाणी घेतल्यास आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. शनिवारच्या दिवशीसुद्धा हाच नियम लागू. 

4/6

कोणताही शुभमुहूर्त असेल त्या वाराला केस धुवू नयेत, कापूही नयेत. पौर्णिमा, एकादशी, अमावस्या या दिवसांना केस धुवू नयेत. तुम्ही कोणा एका सणासाठी तयार होत असाल, तर ही कामं आधीच उरकून घ्या. 

 

5/6

सहसा अनेक महिला किंवा पुरुषही एखाद्या उपवास किंवा व्रतवैकल्यांच्या दिवशी केस धुतात. पण, असं करू नये. उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असल्यास ते आधी कच्चं दूध आणि नंतर पाण्यानं स्वच्छ करावेत. 

 

6/6

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)





Read More