Hanuman Jayanti 2023 : गुरुवारी 6 एप्रिल 2023 ला देशभरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी हनुमान जयंतीला राशीनुसार भोग लावा.
मेष राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बेसन लाडू अर्पण करावेत.
वृषभ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला तुळशीच्या बिया अर्पण कराव्यात.
मिथुन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला तुळशीचे पान अर्पण करावे.
कर्क राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला गाईच्या तुपाची बेसनाची खीर करून पूजेच्या वेळी अर्पण करावीत.
सिंह राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला जिलेबी अर्पण करावीत.
कन्या राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला चांदीचा वर्क लावलेली मिठाई अर्पण करा.
तूळ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला मोतीचूर म्हणजेच बुंदीचे लाडू भोग म्हणून अर्पण करा.
वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला गाईच्या तुपात बनवलेले बेसनाचे लाडू अपर्ण करा.
धनु राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला बुंदीचे लाडू आणि तुळशीची पाने अर्पण करा.
मकर राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला मोतीचूरचे लाडू अर्पण करावेत.
कुंभ राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला सिंदूर आणि लाडू अर्पण करावीत.
मीन राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला लवंग अर्पण करावीत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)