PHOTOS

60 कोटींची मालमत्ता आणि लाखो रुपयांच्या लग्जरी गाड्या... हरभजन सिंगची एकूण संपत्ती माहित आहे का?

Harbhajan Singh’s Net Worth: आज माजी भारतीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचा 45 वा वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटमध्ये ‘टर्बनेटर’ नावाने प्रसिद्ध असलेले हरभजन सिंग, फक्त मैदानावरच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही तितकेच यशस्वी ठरले आहेत. ‘भज्जी’ नावाने ओळखला जाणारा हा ऑफस्पिनर आज करोडपती आहे. क्रिकेटमधील कमाई, जाहिराती, व्यवसाय आणि इतर गुंतवणुकीमुळे हरभजनने प्रचंड संपत्ती मिळवली आहे.

 

Advertisement
1/8

2025 पर्यंत हरभजन सिंग यांची एकूण अंदाजे संपत्ती सुमारे 10 मिलियन डॉलर्स (अंदाजे 83 कोटी रुपये) इतकी आहे. विविध उत्पन्नाच्या स्रोतांमुळे त्याची आर्थिक घडी भक्कम बसली आहे.

2/8

1998 ते 2016 या कालावधीत हरभजनने भारतासाठी खेळले. टेस्ट आणि वनडे दोन्ही प्रकारांमध्ये त्याने आपली छाप पाडली. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्ससाठी खेळत असताना त्यांनी भरघोस रक्कम मिळवली. त्याचा सर्वोच्च आयपीएल पगार 5.5 कोटी रुपये होता.

3/8

पेप्सी, रिबॉक, रॉयल स्टॅग, नेरोलॅक पेंट्स यांसारख्या प्रसिद्ध ब्रँड्ससोबत त्यांचा करार होता. या जाहिरातींमधून त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला.

4/8

हरभजनने ‘भज्जी दा ढाबा’ नावाने पंजाबमध्ये रेस्टॉरंट्सची साखळी सुरू केली आहे. त्याचबरोबर जिम्स आणि फिटनेस सेंटर्समध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे, ज्यातून सातत्याने उत्पन्न येते.

5/8

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हरभजनने क्रिकेट एक्सपर्ट, कमेंटेटर म्हणून काम केलं. ‘खतरों के खिलाड़ी’सारख्या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आणि तमिळ चित्रपटसृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केले.

6/8

हरभजन सिंगचे जालंधरमध्ये आलिशान बंगलं आणि मुंबईत उच्चभ्रू अपार्टमेंट आहे. याशिवाय इतर ठिकाणीही त्यांनी प्रॉपर्टीत गुंतवणूक केली आहे.

 

7/8

हरभजन त्याच्या लक्झरी लाइफस्टाइलसाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Hummer H2, BMW X6 आणि Ford Endeavour सारख्या गाड्यांचा समावेश आहे. तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि प्रवास करणं पसंत करतो.

8/8

आपली संपत्ती असूनही, हरभजन समाजकार्यात सक्रिय असतो.  त्याने अनेक चॅरिटीजना मदत केली असून, वंचित मुलं आणि ग्रामीण विकास यासाठी विशेष योगदान दिलं आहे.

 





Read More