जबरदस्त अभिनय, बिनधास्त बोलणं आणि बॉलिवूडमध्ये कोणताही फिल्मी बॅकग्राउंड नसताना देखील ही अभिनेत्री बनली लोकप्रिय. तुम्ही ओळखलं का?
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नसताना देखील आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर लोकप्रिय झाल्या.
अशीच एक बॉलिवूड अभिनेत्री जिला कोणतेही फिल्मी बॅकग्राउंड नसताना देखील तिने आपल्या अभिनया आणि सौंदर्याने प्रेक्षकांना वेड लावलं. आज ती ग्लोबल क्वीन म्हणून ओळखली जाते.
जबरदस्त अभिनय आणि मोकळे पणाने बोलणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरैशी. 28 जुलै रोजी जन्मलेल्या हुमा कुरेशीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. आज ती तिचा 38 वा वाढदिवस साजरा करतेय.
हुमा कुरेशीने 2012 साली अनुराग कश्यपच्या चर्चित ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं. तिच्या मोहसिनाच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली.
त्यानंतर तिला बेस्ट डेब्यू आणि बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेससाठी फिल्मफेअर नामांकन मिळालं. 'लव शव ते चिकन खुराना', 'एक थी डायन', 'डेढ इश्किया', 'बदलापूर', 'जॉली एलएलबी 2' यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
फक्त हिंदीच नाही तर तिने मराठी, तमिळ आणि एका हॉलिवूड चित्रपटात देखील काम केलं आहे. तिचे वेबसीरीज 'महारानी'मधील अभिनयाचे प्रचंड कौतुक झालं.
हुमा केवळ अभिनेत्रीच नाही तर एक लेखिकाही आहे. 2023 मध्ये तिने आपली पहिली कादंबरी ‘Zeba: An Accidental Superhero’ प्रसिद्ध केली. जी अनेक साहित्य महोत्सवांमध्ये चर्चेत राहिली.
तिला तीन फिल्मफेअर नामांकनं आणि एक फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड मिळाला आहे. याशिवाय, ती विविध सामाजिक संस्थांशी जोडलेली असून एनजीओंसोबत काम करते.